Saturday, June 22, 2024
Homeआध्यात्मिकमकर संक्रांत.. सकाळी उठल्यावर पहा ही वस्तू.. वर्षभर सुख, समृद्धी, संपत्ती टिकून...

मकर संक्रांत.. सकाळी उठल्यावर पहा ही वस्तू.. वर्षभर सुख, समृद्धी, संपत्ती टिकून राहील.!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! 15 जानेवारी रविवारचा दिवस आणि या दिवशी आली आहे मकर संक्रांती. आणि या दिवशी सकाळी उठल्यावर आपण या एका वस्तूच दर्शन घेतलं तर माता लक्ष्मी वर्षभर आपल्या घरामध्ये स्थायी रूपाने वास करते. मित्रांनो या वस्तूचं फक्त दर्शन घेतल्यास आपल्या कुंडलीतील शुक्र आणि बुध हे दोन ग्रह प्रचंड मजबूत बनतात. शुक्र हा संपत्तीचा कारक आहे. ज्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असतो, उच्च स्थानी असतो अशा लोकांच्या जीवनात लक्ष्मीची धनाची प्राप्ती अखंड स्वरूपात सुरू होते.

अशा लोकांच्या जीवनात पैसा धन सातत्याने येऊ लागतं आणि बुध ग्रह हा हजरजबाबीपणा बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णय क्षमता यांच्याशी संबंधित आहे. मित्रांनो हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात गरिबी नावाला ही उरत नाही. आपल्याला नक्की कोणती वस्तू बघायची आहे तर मित्रांनो या दिवशी सकाळी घरातील जी महिला आहे, जी गृहिणी आहे तिने लवकर उठायचं आहे स्नान करायच आहे आणि त्यानंतर एका पात्रामध्ये थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षत म्हणतो तर असे तांदूळ एका पत्रात घ्यायचे आहे आणि या तांदळामध्ये थोडीशी पिवळ्या रंगाची मुगडाळ, पिवळ्या रंगाची जी मूग डाळ असते ती टाकायची आहे.

आता तांदूळ आणि मूगडाळ या दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करायचे आहेत आणि याच वस्तूचे दर्शन घरातील प्रत्येक व्यक्तीने स्नान केल्यानंतर घ्यायच आहे. मित्रांनो घरातील प्रत्येक व्यक्तीने स्नान करायचा आहे आणि तांदूळ व मूग डाळीचे दर्शन घ्यायच आहे. आता हे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे पैसे या तांदूळ व मुगडाळीमध्ये टाकायचे आहेत. दहा रुपये टाकू शकता पन्नास रुपये शंभर हजार तुमची इच्छा आहे, तेवढे पैसे आपण या तांदूळ व मूग डाळीचे दर्शन घेतल्यानंतर त्यामध्ये ठेवायचे आहेत.

फक्त लक्षात ठेवा की हे पैसे ठेवत असताना त्यावरती आपण एक रुपयाचा शिक्का नक्की ठेवा. म्हणजे तुम्ही दहा रुपये ठेवत असाल तर दहा रुपयावरती एक रुपया ठेवायचा आहे. पन्नास रुपये ठेवताय तर ते पन्नास रुपया वरती सुद्धा आपण एक रुपये ठेवायचे आहे. या मूग डाळ आणि तांदळाचे दर्शन घेतल्यानंतर जे पैसे आपण ठेवलेले आहेत हे पैसे कोणत्याही गोरगरिबास आपण दान करायचे आहे. ज्या व्यक्ती ला मदतीची गरज आहे त्याला हे सर्व दान करायचे आहे. जर तुम्हाला सकाळी सकाळी हे दान करणे शक्य नसेल तर मकर संक्रांतीस सूर्यास्त होण्याच्या आधी कधीही आपण हे दान करू शकता.

मित्रांनो याला गुप्त दान म्हटलं जातं. गुप्त दानामुळे गुप्त लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही हे दान करत आहे हे कुणालाही सांगू नका. मित्रांनो या गुप्त दानामुळे आपण जेवढी मेहनत करतो जेवढे कष्ट करतो त्याच्या कितीतरी अधिक पटींनी पैसा धन आपल्याला प्राप्त होतं. आपण अपेक्षाही केली नसेल एवढा पैसा आपल्या घरात या उपायामुळे येऊ लागेल. तर आपण सुद्धा या मकर संक्रांतीस हा छोटासा उपाय नक्की करून पहा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular