नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी पेजवर तुमचे स्वागत आहे.. आपल्यापैकी अनेक जण स्वामींचे भक्त आहेत. स्वामींची अगदी मनोभावे व श्रद्धेने हे भक्त सेवा, पूजा, अर्चना करीत असतात. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे वेगवेगळ्या देवी-देवतांचे परम भक्त असतात. मित्रांनो स्वामी सेवा करत असताना कधीही मनात कोणतीही शंका कुशंका आणू नये.
अगदी मनोभावे स्वामींची सेवा केल्याने इच्छित फल प्राप्त होते. मित्रांनो प्रत्येकालाच आपल्याकडे धनसंपत्ती असावी तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, प्रत्येक कामात यश मिळावे, विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणात भरघोस यश प्राप्त व्हावे यासाठी आपण आणि उपाय करीत असतो.
परंतु अनेक वेळा काय होते की ह्या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही. तर असे काही स्वामीभक्त देखील असतात की ते स्वामींची भक्ती करतात आणि त्यांना त्याची प्रचिती, स्वामींचे अनुभव लगेचच प्राप्त होतात आणि असे काहीसे भक्त असतात की कितीही त्यांनी स्वामींची भक्ती केली तरीही त्यांना स्वामींची प्रचीती, लाभ मिळत नाही.
तर मित्रांनो नेमके आपल्या भक्तीमध्ये काय कमी पडत आहे ज्यामुळे आपल्याला स्वामींची प्रचिती येत नाहीये. याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो गुरुचरित्र मधील अध्यायामध्ये एक धोबी दररोज कपडे धुण्यासाठी नदीवर जात असतो आणि त्याच नदीवर आपले गुरुदत्त महाराज दररोज स्नान करण्यासाठी जात होते. त्यावेळेस हा धोबी दत्त महाराजांना नमस्कार करतो. वंदन करतो. तो दररोज दत्त महाराजांना नमस्कार करण्यास सुरुवात करतो.
एके दिवशी दत्तमहाराज त्यात धोनीला म्हणतात की तू मला दररोज नमस्कार करतो आहेस हे पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे काही हवे आहे ते सर्व काही मिळेल. तुझ्या जिवनातुन आता संकट दूर होणार आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये फक्त आनंद निर्माण होईल. हे ऐकल्यानंतर हा धोबी खुश होतो आणि तो दररोज दत्त महाराजांना नमस्कार करायला सुरुवात करतो आणि मठात जाऊन दुरून तो नमस्कार करत असतो.
एके दिवशी काय झाले त्या नदीवर एक राजा आपल्या राणीसह एका सजवलेल्या नावेमध्ये जल विहार करण्यासाठी आलेला असतो आणि त्यावेळेस त्या राजा राणीच्या नावेकडे या धोबीची नजर जाते. क्षणभर का होईना त्या धोब्याला असे वाटते की ते राजा राणी किती सुखी आहेत. असे आयुष्य मलाही प्राप्त व्हावे. मी आयुष्यभर कष्ट करत आलेलो आहे.
धोब्याची इच्छा दत्तगुरु महाराजांना कळते. कारण धोबी दत्तगुरूंचा भक्त असतो. त्यावेळेस दत्तगुरु महाराज त्याला म्हणतात की तुला असे आयुष्य हवे आहे का आणि तुला या जन्मात असे आयुष्य हवे आहे की पुढच्या जन्मात असे आयुष्य हवे आहे.
त्यावेळेस धोबी म्हणतो की आता माझे खूपच कमी आयुष्य राहिले आहे. मला पुढचा जन्म राजा व्हायला आवडेल आणि पुढच्या जन्मी दत्त महाराज तुम्ही मला दर्शन द्यावे. असे तो दत्त महाराजांना सांगतो. दत्त महाराज त्या धोब्याला होय म्हणतात. तर मित्रांनो हा आहे गुरुचरित्र मधील 9 वा अध्याय.
मित्रांनो तुमच्याही आयुष्यामध्ये जर काही अडचणी येत असतील, कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, अनेक गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्ही देखील गुरुचरित्र मधील 9वा अध्याय अवश्य वाचा. परंतु हा अध्याय दररोज न चुकता वाचायला हवा. हा अध्याय वाचायला सुरुवात केल्यानंतर अकरा दिवसात किंवा 21 दिवसात फरक जाणवेल .
म्हणजेच काय की तुम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होतील किंवा त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळेल. मित्रांनो तुम्ही स्वामींचे, गुरु दत्त महाराजांची सेवा केल्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्ही हा अध्याय वाचू शकता. जर तुम्ही स्वामींची सेवा करत नसाल तरी देखील तुम्ही हा अध्याय नक्की वाचा.
अध्याय वाचण्यापूर्वी आणि वाचल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून मार्ग दाखवावा तसेच अडचणी दूर व्हाव्यात यासाठी स्वामींना, गुरुदत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे. दररोज अध्याय वाचत असताना वाजण्याच्या अगोदर व वाचल्यानंतर तुम्हाला दररोज ही प्रार्थना स्वामींना, दत्तगुरुंना बोलून दाखवायची आहे. हा अध्याय तुम्हाला तीन महिने दररोज न चुकता वाचायचा आहे.
मित्रांनो ज्या काही गोष्टींची कमतरता तुमच्या जीवनामध्ये असेल, अडचणी असतील त्या सर्व दूर झालेल्या दिसतील. म्हणजेच तीन महिने तुम्ही जरा हा अध्याय वाचला तर या तीन महिन्यापूर्वी तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल. तुम्हाला फक्त स्वामींना गुरुदत्त महाराजांना शरण जायचे आहे आणि अगदी मनोभावे व श्रद्धेने गुरुचरित्र मधील 9 वा अध्याय न चुकता वाचायचा आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे सादरर होणारे लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेजला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शे*यर करा. धन्यवाद..!!