Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकमार्गशीर्ष गुरुवार.. महालक्ष्मी व्रत उद्यापन.. सुवासिनींना नक्की द्या ही एक वस्तू पैशांचा...

मार्गशीर्ष गुरुवार.. महालक्ष्मी व्रत उद्यापन.. सुवासिनींना नक्की द्या ही एक वस्तू पैशांचा ढीग लागेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. आणि या महिन्यातील गुरुवारी अनेक महिला माता लक्ष्मीचे व्रत करतात. आपल्या घरामधे सुख समृद्धी, धन संपत्ती यावी तसेच माता लक्ष्मीचं आपल्या घरामधे आगमन व्हावं आणि सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात होऊन शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. या व्रताचे उद्यापन करताना सुवासिनींना एक वस्तू अवश्य द्या…

मित्रांनो हे उद्यापन करण्यासाठी आपण पाच सात किंवा अकरा सुवासिनी किंवा कुमारिका यांना आपल्या घरी बोलवायचं आहे. साक्षात लक्ष्मीचं रूप समजून या कुमारिका किंवा सुवासिनी यांची पूजा आपण करायची आहे. त्यांना हळद कुंकू लावायच आहे, माता लक्ष्मी कथेची एक एक प्रत त्यांना द्यायची आहे.

आणि या बरोबरच एक फळ फुल आणि एक विशेष वस्तू आपण न विसरता द्यायची आहे ती म्हणजे हळद कुंकू. हळद कुंकू याची एखादी छोटीशी डबी आपण त्यांना देऊ शकता किंवा एखाद्या छोट्याश्या कागदात हे हळद कुंकू बांधून आपण त्यांना द्यायचं आहे.

आपल्या हिंदू धर्मात हळद आणि कुंकू यांना विशेष महत्व आहे. हळद आणि कुंकू हे दोन्ही सुद्धा सौभाग्य द्रव्य समजले जातात. प्रत्येक शुभ कार्यात हळद आणि कुंकू यांचा मान सर्वात मोठा असतो. व धार्मिक विधी मध्ये यांचा वापर केला जातो. आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळद आणि कुंकू अतिशय प्रिय आहे.

आणि म्हणूनच लक्ष्मी स्वरूप समजल्या जाणाऱ्या या सुवासिनी आणि कुमारिका यांना या व्रताचे उद्यापन करताना हळद आणि कुंकू अवश्य दिले पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण करते.
­
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular