Thursday, June 13, 2024
Homeआध्यात्मिकमार्गशीर्ष महिना विशेष.. कुटुंबाच्या सौख्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात करावयाचे षोडशोपचार आणि व्रतवैकल्ये.!!

मार्गशीर्ष महिना विशेष.. कुटुंबाच्या सौख्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात करावयाचे षोडशोपचार आणि व्रतवैकल्ये.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते. हा 30 दिवसांचा असतो. मार्गशीर्ष महिन्याला हिंदीत अगहन म्हणतात. मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर, डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो. हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सुहासिनी महिला मनोभावे लक्ष्मी मातेच व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात.

कुटुंबात सौख्य – समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. यंदा 2022 मध्ये मार्गशीर्ष महिना 24 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे आणि योगायोग म्हणजे हा दिवस गुरुवार असल्यामुळे या महिन्याचा पहिला गुरुवार हा 24 नोव्हेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे.

तर पाचवा मार्गशीर्ष गुरुवार 22 डिसेंबर 2022 यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार व्रत केले जातील. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पण देवदिवाळी साजरी केली जाते. देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापन केला जातो. ताम्हनामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेऊन त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडले जाते. श्रीफळ कलशाची विधिवत पूजा केली जाते, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधली जाते. आशा रीतीने घटस्थापना झाल्यावर पाच अथवा सात पानांची माळ सोडतात.

अखंड तेलाचा नंदादीप देवाजवळ सहाही दिवस तेवत राहील असे पाहतात, आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्ठी पर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो याला मार्तंड भैरव षडरात्रोत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात.

या उत्सवातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्व सांगितले आहे. पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्याच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखविला जातो.

घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो. घरातल्या मुलं व पाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातला खोबर आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाच आणि ऋषिमुनी आणि समस्त मानव जातीला त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन असुरांच युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मणी आणि मल्लांचा संहार केला

म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरायावर चंपक म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात. आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांज्याच्या गोड घारग्यांचा नैवेद्य दाखविला जातो. असा आहे आपला परिपूर्ण मार्गशीर्ष महिना.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular