Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यMesh Astro Left 2023 चा उत्तरार्ध मेष राशीसाठी कसा असणार? काय मिळवणार...

Mesh Astro Left 2023 चा उत्तरार्ध मेष राशीसाठी कसा असणार? काय मिळवणार काय गमवावे लागणार.?

Mesh Astro Left 2023 चा उत्तरार्ध मेष राशीसाठी कसा असणार? काय मिळवणार काय गमवावे लागणार.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… सर्वसाधारण घरी किंवा ऑफिसात पाहुणे येण्याची शक्यता आहे. एक आठवडाभर तुम्ही अनेकदा पाहुण्यांचं आदरातिथ्य कराल. तुम्हाला मनाने पूर्वीपेक्षा अधिक सुसंघटित व्हायला हवं. अकाउंट्समध्ये थोडीशी चूकही नंतर भोवेल.

रिलेशनशिप – सध्या ओढ लावणारा कालावधी आहे त्यामुळे संयमाने कुणाचीतरी वाट पहा. ब्रेकअपनंतर पुढे जाण्याचा निर्णय तुम्ही घ्याल.

करिअर – अचानक आलेला फोन कॉल एखादी व्यवसायाची संधी घेऊन येईल. (Mesh Astro Left 2023) तुमच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा कमी करा. अनपेक्षित व्यक्तीच्या मदतीने मार्ग सुकर होईल.
लकी रंग – Salmon red

ऑगस्ट –सर्वसाधारण आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यात अगदी थोडा फरक असतो हे नुकत्याच घडलेल्या काही प्रसंगांतून तुमच्या लक्षात आलं असावं. याआधी तुम्ही अनेकदा मर्यादा सोडून वागला आहात. भूतकाळातील अनुभवांतून तुम्ही शिकायला हवं नाहीतर तुम्ही उद्धट आहात असंच लोक म्हणतील. लवकरच तुमच्या आवडीची गोष्ट मिळेल.

रिलेशनशिप – काही गैरसमज होऊ शकतात. तुम्ही चूक स्वीकारा. पूर्वायुष्यातील कुणीतरी संवाद साधण्यासाठी परत जीवनात प्रवेश करेल.

करिअर – करिअरमध्ये काही अडचणी येतील पण आत्मविश्लेषण, आत्मपरीक्षणही कराल. तुमच्या भविष्यातील बेतांबाबत एखाद्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्या. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्हाल. लकी रंग – Sapphire Blue

सप्टेंबर – सर्वसाधारण – तुम्ही गढून जाऊन जे काम करताय त्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे. एकतर तुम्ही प्रोजेक्टचा व्यवस्थित गृहपाठ करून जा किंवा सावध रहा. कुणा भावनिक व्यक्तीला तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत पण तुम्हाला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीए. लवकरच सुटी घ्याल. (Mesh Astro Left 2023)

रिलेशनशिप – नियतीशी जुळवून घ्याल. तुमचा विश्वास असलेल्या जोडीदारासोबत राहिल्यास मनाला शांती मिळेल. तुम्ही माणसांशी बोलताना कंटाळता पण त्यांच कारण लवकरच शोधावं लागेल.

करिअर – तुमच्या कल्पना आता सत्यात यायला हव्यात. ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल गॉसिपिंग सुरू असेल. कदाचित तुम्ही मॅनेजमेंटचे लाडके असाल पण इतर तुमचा मत्सर करतात. लकी रंग – Mocha

ऑक्टोबर – सर्वसाधारण – कुठल्याही गोष्टीत तुमची चूक नसली तरीही काहीही चुकीचं झालं की तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. एकतर तुम्ही चुकीचा निर्णय घेता किंवा चुकीच्या व्यक्तीला माहिती देता त्यामुळे सगळं कोसळतं. चलाख मंडळी निसटतात आणि तुम्ही अडकता. स्वत: ला वेळ देऊन आपल्या मनाचं ऐकलंत तर ते दीर्घकालीन हिताचं ठरेल.

हे ही वाचा : Jaya Yog Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog कोटीपती, चंडिका आणि जया योग तयार झाल्यामुळे या राशी होणार कोट्यधीश..

रिलेशनशिप – तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं. विवाहित असाल तर काळ चांगला. (Mesh Astro Left 2023) एक विचित्र नातं स्वीकारावं असा आग्रह होईल पण तुम्ही टाळाल.

करिअर – तुम्ही एखाद्याला मदत केली असेल पण तो ती विसरून जाईल. नवी कौशल्य शिकून घ्या. ऑफिसातील दबावामुळे काही दिवस वाया जातील. लकी रंग – Stone Grey

नोव्हेंबर – सर्वसाधारण – थोडा धीर धरा, तुम्हाला हवं ते मिळेल. कर्म करायला चांगला काळ आहे. तुमचं आदर्श रूटिन पक्कं करा आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसाला त्याबद्दल सांगा. सरकारी कामं होतील. लवकरच प्रवासाला जाल.

रिलेशनशिप – क्षुल्लक कारणावरून तुमचं आणि जोडीदाराचं भांडण होईल. (Mesh Astro Left 2023) कुणीतरी विक्षिप्त वागेल आणि नंतर पश्चात्ताप करेल. नात्याचा आदर करा.

करिअर – तुमचा धंदा जोरात चालेल. तुम्ही स्टार्टअप सुरू केलं असंल तर नवे नियम येतील. वातावरणात नकारात्मकता जाणवेल. कुणालाही नोकरीवर ठेवण्याआधी त्या व्यक्तीची पक्की माहिती काढून घ्या. लकी रंग – Banana Yellow

डिसेंबर – सर्वसाधारण – तुम्ही स्वप्न आणि कृती यांची गल्लत करताय. तुम्ही मोठी स्वप्नं पाहता पण ती पूर्ण करेपर्यंत तुम्हाला दम धरवत नाही आणि तुम्ही निराश होता. एखादी उत्तम कल्पना तुम्हाला सुचेल. (Mesh Astro Left 2023) महत्त्वाच्या गोष्टी मागे पडतील पण स्वत: ची काळजी घ्याल, तातडीची कामं कराल. जुना छंद नव्याने आठवेल.

रिलेशनशिप – वैयक्तीक नातं धोक्यात आल्याने तुम्ही कुटुंबात चर्चेत रहाल. तुम्ही नुकतंच भेटलेल्या व्यक्तीबद्दल तुमची भावना जरा नकारात्मक होईल. छोटा प्रवास मन प्रसन्न करेल.

करिअर – तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि भविष्यातील संधींची दारं उघडतील. तुमचा प्रभावही पडेल. आयटी क्षेत्रातील काहींना पट्कन नवा जॉब मिळेल. लकी रंग – Bronze

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular