Friday, April 12, 2024
Homeआध्यात्मिकमोठा मंगळवार दुःखाचा काळ सुखामध्ये बदलणार.. श्री स्वामींची ही विशेष सेवा करा.....

मोठा मंगळवार दुःखाचा काळ सुखामध्ये बदलणार.. श्री स्वामींची ही विशेष सेवा करा.. फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आजचा मंगळवार हा श्रावणातील शुभ दिवस आहे.. सध्या महादेवांचा पावन श्रावणमास सुरु असल्यामुळे आजचा मंगळवार विशेष मानला जातो.. हा मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांचा देखील दिवस मानला जातो. म्हणून आज आपण श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करत असतो, त्यानुसार आज सुद्धा आपल्याला स्वामी महाराज विशेष सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

याचबरोबर सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि आपल्याला ही विशेष सेवा संपूर्ण ज्येष्ठ महिना संपेपर्यंत करायची आहे. यामध्ये या विशेष मंत्राचा जप फक्त 108 वेळेस आपल्या करायचा आहे आणि हा चमत्कारिक मंत्राचा जप करताना, तो जप अत्यंत विश्वासाने आणि मनोभावाने तसेच पूर्ण श्रद्धेने झाला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायचे आहे.

तसेच या सेवेमध्ये तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी, लहान मुलं असं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि मंत्र जप करू शकतात. तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरा समोर बसायचं आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थसमोर बघायचा आहे.

मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सर्वात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की,
” ओम परब्रम्हाय नमः”
” ओम परब्रम्हाय नमः”

हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा जास्त नाही किंवा 108 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. मंत्रजप करता कोणतीही घाई करू नका आणि मंत्र जप हा विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे, तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular