Sunday, July 14, 2024
Homeआध्यात्मिकमोठा शुक्रवार चुकूनही करू नका हे एक काम.. अन्यथा घरात येईल अठराविश्वे...

मोठा शुक्रवार चुकूनही करू नका हे एक काम.. अन्यथा घरात येईल अठराविश्वे दारिद्रय.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेचा म्हणून ओळखला जातो. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार म्हणून ओळखला जातो. माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केल्याने तसंच लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या घरामध्ये धन वैभव आणि संपन्नता येते. या दिवशी जर आपण काही शुभकार्य केले, दान  केलं तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबाला सदैव सुखी आणि संपन्न राहण्याचा आशीर्वाद देते. 

आपल्या घरामध्ये भरपूर धन व भरपूर पैसा यावा यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर  काही उपाय देखील केले जातात.  त्याचबरोबर काही अशी कामे आहेत जी आपण शुक्रवारच्या दिवशी चुकूनही करू नये. जर आपण हि कामे शुक्रवारच्या दिवशी केली तर, माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. घरामध्ये हळूहळू आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात.  या चुका कोणत्या आहेत? या शुक्रवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत? त्याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी चुकूनही माता लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे विसर्जन करू नका. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मी च्या आगमनाचा दिवस आणि या दिवशी जर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे विसर्जन केलं तर, माता लक्ष्मीला आपल्या घरातून घालवून देण्यासारखा आहे. अनेक लोक आपल्या मंदिरांमध्ये जर खंडित मूर्ती असेल तर, ते पाण्यामध्ये विसर्जित करतात. परंतु  ही मूर्ती शुक्रवारच्या दिवशी विसर्जित करू नका.

शुक्रवारच्या दिवशी तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करू शकता. परंतु खंडित मूर्ती या दिवशी विसर्जित करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उदाहरण म्हणून पैसे घेऊ नका.असे केल्याने आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही.आपल्या घरात जो पैसा येतो तो टिकून राहत नाही. पैसा पाण्यासारखा वाहून जातो. 

जर या दिवशी एखाद्या व्यक्तीला खूप गरज असेल आणि त्यासाठी तुम्ही मदत म्हणून हे पैसे देऊ शकता. परंतु उधार म्हणून कोणालाही या दिवशी पैसे देऊ नका. तसेच या दिवशी म्हणजे शुक्रवारी कोणालाही माता लक्ष्मीची मूर्ती भेट म्हणून देऊ नका. यामुळे सुद्धा आपली आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते.  पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो.

दररोज संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा देव पूजा करतो. त्यावेळी चुकूनही आपल्या जो मुख्य दरवाजा आहे. तो बंद ठेवू नका. कारण ही वेळ म्हणजे माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते. यावेळी माता लक्ष्मी भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये पूजापाठ चालू असेल. वातावरण शांत असेल. प्रसन्न असेल. अशा घरांमध्ये माता लक्ष्मी आगमन करते आणि अशावेळी जर आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवला तर, माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही.

त्यामुळे संध्याकाळचे वेळी म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो. त्यावेळी थोडा वेळ का होईना घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा.  असं केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते. तर मित्रांनो या होत्या काही गोष्टी ज्या शुक्रवारच्या दिवशी चुकूनही करू नयेत. या छोट्या-छोट्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर, माता लक्ष्मी चा आशीर्वाद सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular