Sunday, July 14, 2024
Homeआध्यात्मिकमोठा शुक्रवार सुख तथा संपन्नतेसाठी श्री स्वामींची ही एक विशेष सेवा करा...

मोठा शुक्रवार सुख तथा संपन्नतेसाठी श्री स्वामींची ही एक विशेष सेवा करा फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आज मोठा शुक्रवारचा दिवस असुन, आपण दररोज स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नित्यसेवा आपण श्री दत्तजयंती येईपर्यंत करणार आहोत. कारण दत्तजयंती पर्यंतचे जेवढे दिवस असतात ते अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत शुभ मानले जातात म्हणून या दिवसांमध्ये त्यांची सेवा केली जाते. आज आपण स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करणार आहोत.

याचबरोबर तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असं कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात. याचा आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर म्हणजेच आपल्या स्वामींचा मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसायचं आहे. त्याला अगरबत्ती दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडायचे आहे.

श्री स्वामी समर्थांच्या प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी तसेच आरोग्यासाठी, त्यानंतर संकट, समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, आपले दोन्ही हात जोडून हा मंत्र तुम्हाला बोलायचं आहे. हा मंत्र पाहिजे असा आहे की,
“ओम औदुंबरप्रियाय नमः”
“ओम औदुंबरप्रियाय नमः”
या अत्यंत पवित्र अशा मंत्राचा जप फक्त 108 वेळेस करायचे आहे. 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणीही घाई करू नका, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे त्याच्या जप नक्कीच करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular