Sunday, June 9, 2024
Homeआध्यात्मिकमोठ्यात मोठी अडचण दूर करण्याची ताकद स्वामींच्या ठायी असते.. अशक्यही शक्य करतील...

मोठ्यात मोठी अडचण दूर करण्याची ताकद स्वामींच्या ठायी असते.. अशक्यही शक्य करतील स्वामी.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, जेव्हाही तुमच्या जीवनात अडचणी वाढतात संकटं वाढतात चिंता वाढतात काय करावे हे कळत नाही त्यावेळेला तुम्ही फक्त स्वामींच्या या दोन ओळी बोलायच्या आहेत. या दोन ओळींमध्ये एवढी ताकद आहे एवढी चमत्कारी शक्ती आहे ना, जी तुमच्या अडचणी लगेचच तुमच्यापासून दूर करेल. ज्याही प्रश्नांची उत्तरे किंवा जे ही मार्ग तुम्हाला हवे आहेत.

ते तुम्हाला लगेचच मिटतील. अडचणी आल्या टेन्शन वाढले तर आपल्या जीवनात आपल्याला समजत नाही की आता काय करावं यातून कसं बाहेर पडावं आणि हे प्रत्येकाच्या जीवनात ही एक वेळ येतेच.. गरीब असू द्या श्रीमंत असू द्या.. यातुन कुणीही सुटत नसतं.. सगळ्यांच्याच जीवनात अडचणी लागोपाठ सुरूच असतात असा कोणता व्यक्ती नाही की त्याच्या जीवनात टेन्शन्स नाहीत अडचण नाहीत प्रत्येकाच्या जीवनात असतात..

जर तुम्हाला अडचणी असतील टेन्शन्स असतील तर लगेचच या दोन ओळी बोलाव्यात असं नाही की एक वेळेस तुम्ही रोज बोला तुम्हाला रोज याने चमत्कारिक शक्ती मिळेल एक ताकद मिळेल. एक ऊर्जा मिळेल आणि तुम्ही प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीमधून बाहेर निघाल नाही जेव्हाही तुम्हाला अडचणी येतील टेन्शन येईल किंवा काहीतरी प्रश्नांची उत्तरे हवी असतील किंवा तुम्हाला एकटे वाटेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल..

की काय करावे आता कळत नाहीये तेव्हा तुम्ही या दोन ओळी अवश्य बोला. या ओळी काही अशा आहेत “अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील” स्वामी कारण आपले स्वामीच आहे जे प्रत्येक अशक्य गोष्टीही शक्य करतील तुमच्या अडचणी ज्या तुम्हाला अशक्य वाटतात तुमचे टेन्शन जे तुम्हाला अशक्य वाटतंय त्यातून तुम्हाला बाहेर काढण्याच शक्य काम हे स्वामीच करतील.

म्हणून या दोन ओळीत तुम्हाला प्रत्येक संकटातून प्रत्येक समस्येतून प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील आणि तुमचे टेन्शन्स हे चुटकीसरशी दूर करतील त्याच्यामुळे जेव्हा पण कधी टेन्शन वाढेल अडचणी वाढतील तेव्हा या दोन ओळी बोलायला अजिबात विसरू नका

!! तारक मंत्र !! या दोन शब्दातच या मंत्राचा अर्थ दडला आहे.. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे. ज्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी तत्पर असतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन.. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी..तुम्ही.. आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही.

शेवटी ती स्वामींची शक्ती.. अगम्य शक्ती.. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ आपोआपच येते ते..
आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहेच.

अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी.. अशक्यही शक्य करतील स्वामी..

फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या. ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती.. तेव्हा मनातल्या मनात स्वतः लाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत.

ह्या जगाचा जो एकच मालक आहे. ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो.. सर्वांचे रक्षण करतो.. असे स्वामी महाराज माझ्या मागे होते.. आहेत.. आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही.. कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे कि स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत …
ते म्हणतात ना.. भगवंताला.. माझ्या, आपल्या.. स्वामींना बघायला तशी आत्मदृष्टि असावी लागते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular