Wednesday, May 22, 2024
Homeआध्यात्मिकनागदेवता पूजनाचे महत्व, नियम आणि कथा.. कशी साजरी कराल नागपंचमी.?

नागदेवता पूजनाचे महत्व, नियम आणि कथा.. कशी साजरी कराल नागपंचमी.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन या व्रतांप्रमाणे श्रावणात सण-उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते.

याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची पूजा केली जाते. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना महादेवांची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. नागपंचमीचा मुहूर्त, पूजाविधी, महत्त्व आणि मान्यता यांविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊयात…

अशी साजरी करावी नागपंचमी – आज मंगळवार 2 ऑगस्टला नागपंचमी असून, या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करावी. नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी. पूजेवेळी..

‘नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!’ ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:!

या मंत्राचा मंत्रोच्चार करावा. नागदेवता पूजजनाच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही, असे भविष्य पुराणात सांगितले गेले आहे. सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दूर्वा आणि शेंदूर लावावे.

या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये. दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत, असे अनेक संकेत आहेत. त्या संबंधीच्या विविध कथाही सर्वश्रुत आहेत.

नागपंचमीची कथा – एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती.

शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूध – लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular