Thursday, June 13, 2024
Homeआध्यात्मिकनरक चतुर्दशी.. पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.!!

नरक चतुर्दशी.. पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! दिवाळी हा सण भारत देशातील हिंदूंच्या महान व मोठ्या सणांपैकी एक आहे. हा सण संपूर्ण देशभरात पाच दिवसांच्या मालिका म्हणून साजरा केला जातो. हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीज सणाने संपतो. यानिमित्ताने घर आणि परिसराची स्वच्छता केली जाते. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दीपावली, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. महापर्वाच्या पाच दिवसात विविध देवतांची पूजा विधी आणि विधीपूर्वक केली जाते.

त्यापैकीच असणाऱ्या नरक चतुर्थी सणाबद्दल आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. शास्त्रानुसार नरक चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. नरक चतुर्दशी दिवाळीच्या एक दिवस आधी आणि धनत्रयोदशीच्या एक दिवसानंतर साजरी केली जाते. मात्र यावेळी नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी साजरी होणार आहे. याला छोटी दिवाळी, रूप चौदस, नरका चौदस, रूप चतुर्दशी किंवा नरका पूजा असेही म्हणतात. या दिवशी मृ’त्युदेवता, यमराज आणि श्रीकृष्ण यांची पूजा करण्याचा नियम आहे. रूप चौदसाच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावून परिसर उजळून निघतो. नरक चतुर्दशीची पूजा अकाली मृ’त्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी केली जाते. चला तर मग जाणून घेऊयात.

नरक चतुर्दशी 2022 तिथी आणि शुभ मुहूर्त – मित्रांनो, पंचांग नुसार, कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.03 पासून सुरू होत आहे. दुसरीकडे, चतुर्दशी तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:27 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत नरक चतुर्दशी 24 ऑक्टोबर रोजी उदय तिथीनुसार साजरी केली जाईल.

नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी का म्हणतात – एका पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून देव आणि ऋषींना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. कृष्ण देवाने सुमारे 16 हजार 100 महिलांची मुक्तता करून त्यांना पत्नीचा दर्जा दिला.

नवे आयुष्य, नवी ओळख मिळाल्यानंतर रूप चतुर्दशीला स्वत:ला सजवण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणतात. मोहरीच्या तेलाची मसाज केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी ज्या स्त्रिया अंगावर उटनं आणि मोहरीचे तेल लावतात त्यांना श्रीकृष्णाची पत्नी रुक्मणी देवीची कृपा प्राप्त होते आणि सौभाग्यामध्ये प्राप्त होते.

नरक चतुर्दशी 2022 ची पूजा पद्धत – मित्रांनो, नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शिव, हनुमानजी आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. या सर्व देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करा आणि त्यांची विधिवत पूजा करा.

देवतांच्या समोर धूप दिवा लावा, कुंकुम तिलक लावा आणि मंत्रांचा उच्चार करा. तसेच या दिवशी असे मानले जाते की सूर्योदापूर्वी स्नान केले तर स्वर्गात जागा मिळत असते आणि जर सूर्योदय नंतर स्नान केले तर नरकात जागा मिळते. अशी मानता आहे.

महत्व – नरक चतुर्दशीला यमदेवाची पूजा केल्याने अकाली मृ’त्यूची भीती नाहीशी होते, असे मानले जाते. तसेच सर्व पापांचा नाश होतो, त्यामुळे संध्याकाळी यमदेवाची पूजा करा आणि घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला दिवा अवश्य लावा.

नरक चतुर्दशी पूजा विधी नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे काय करू नये – या दिवशी सूर्योदयापूर्वी शरीरावर तिळाचे तेल लावून पाण्यात औषध मिसळून आंघोळ करून 16 वलय केल्याने सौंदर्य व सौभाग्य वाढते. म्हणूनच या दिवसाला रूप चौदस असेही म्हणतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर मुख्य गेटवर पूर्व दिशेला 4 पेटी मातीचा दिवा ठेवला जातो आणि या दिवशी निळे आणि पिवळे कपडे घालावेत अशीही मान्यता आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular