Friday, June 21, 2024
Homeआध्यात्मिकनवरात्रात अखंड तेवत असणाऱ्या दिव्यातील.. वात जर शिल्लक राहीली.. तर त्या वातीचे...

नवरात्रात अखंड तेवत असणाऱ्या दिव्यातील.. वात जर शिल्लक राहीली.. तर त्या वातीचे काय करावे.? जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आपण नवरात्रीमध्ये देवघरात जो अखंड दिवा लावतो. त्या दिव्याची ती अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते अशी ज्योती.. या ज्योतीला साक्षी ठेवून नवरात्रीत जागरणही केले जाते. अखंड तेवणारी ही ज्योत जागृतीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते, तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे, याची जाणीव करून देण्यासाठी ही ज्योत नवरात्रीत नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवली जाते. परंतु मित्रांनो अशी ही अखंड ज्योत आपण आपल्या घरामध्ये नवरात्रात लावतो.

परंतु ही ज्योत किंवा हा दिवा विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तसाच तेवत असतो आणि आता आपण तर दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मी मातेचे व्रत सोडतो. त्याचबरोबर नवरात्रामधील शेवटचा दिवस असेही या दसऱ्याला म्हटलं जातं मग अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की या दिव्यातील तेलाचे किंवा त्या दिव्यामध्ये नऊ दिवस अविरत तेवत असणाऱ्या वातीचे काय करायचे.? तर आज दशमी म्हणजेच दसरा आहे. आजच्या दिवसाला सर्वच लोक घट विसर्जन करतील. आपल्यापैकी बहुतेक जण नवरात्रीत अखंड दीवा लावत असतात. यामुळे देवी माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते.

असे म्हणतात की जे लोक नवरात्रात अखंड दिवा लावतात त्यांचे मनोरथ पूर्ण होत असते. असेही काहीजण असतात की ज्यांनी मनोभावे देवीची 9 दिवस पूजा केली तरी देखील त्यांचे प्रश्न सुटत नसतात आणि त्यांच्या घरात गरिबीचा राहते. याच कारण आहे मित्रांनो आपण जो दीवा लावत असतो त्यामधली वात. मित्रानो आज आपण जाणून घेऊयात अखंड दिव्यातील ज्योतीचा किंवा दिव्यात तेवत असणाऱ्या वातीचा असा एक उपाय.. की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी राहणार नाही आणि तुमचं कुटुंब धन धान्य संपन्न होईल.

मित्रांनो जो दिवा आपण नवरात्राच्या 9 दिवसात देवघरात लावलेला असतो त्याला तुम्ही चुकूनही सर्वसाधारण दिवा समजू नका. देवघरातील त्या दिव्याला देवीच प्रतीक मानलं जातं. या दिव्याच्या वातीमध्ये नेहमी एक जगृतपणा असतो. या वातीला तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या दंडाला एक तविजमध्ये काढून तुमच्या हाताला कायम स्पर्श होईल अशा अवस्थेत बांधायचे आहे. कारण मित्रांनो या ज्योत मध्ये देवी मातेचा 9 दिवसांचा आशीर्वाद असतो. 9 दिवस अखंड राहिल्या मुले या वतीमध्ये नवी सकारात्मक ऊर्जा संचारत असते. या चे खूप फायदे आहेत चला जाणून घेऊयात.

जो कुणी व्यक्ती ही वात आपल्या बाजूवर, किंवा दंडावर धारण करत असते त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही अ’काल मृ’त्यूचा धोका नसतो. तसेच त्या व्यक्तीसोबत कधीही कुठलीच दु’र्घटना होत नाही. कारण त्याच्यासोबत साक्षात देवी दुर्गांचे सुरक्षा कवच आणि आशीर्वाद असतो. तसेच याचा दुसरा फायदा असा की यामुळे दुसऱ्याची वाईट नजर आणि बुवाबाजी चा तुमच्यावर परिणाम होणार नाही. आपल्यापैकी बरेच जण या कारणामुळे त्रस्त असतात. त्या लोकांनी याचा वापर करावा व जेणेकरून नजर दोष कायमचा मिटेल.

या देवी मातेच्या वातेचा आणखी एक फायदा असा की यामुळे तुम्हाला भूत, प्रेत, पिशाच्च काळी जादू याचा काही एक फरक पडणार नाही. वाईट कुठलाही नकारात्मक शक्ती तमचे काहीच बिघडवू शकणार नाही. अगदी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ज्या व्यक्तींना अर्थिक समस्या आहे किंवा पैसा घरात टिकून राहत नाही त्या लोकांनी ही हे ताविज बाजू दंडाला बांधावे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमचं घर सुख समृध्दी ने परिपूर्ण होईल.

जे पण लोक भौतिक सुखांपासून वंचित असतात ज्यांना गाडी बंगला या सर्व सुखसोयी हव्या असतात. ज्यांना ज्यांना ऐशोआरामत जगायचे असते त्यांनी सुद्धा हे तावीज आपल्या बाजूवर लावले तर त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. बऱ्याच दिवसापासून अतकलेले तिचे काम देखील यामुळे पूर्ण होईल. यामुळे तुम्हाला इच्छीत नोकरी मिळू शकते. तसेच यामुळे दुर्गा माता तुमच्या शरीरात अंशतः वास करत असते. जो पर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत देवी माता तुम्हाला धन संपत्ती, धनधान्य, भरभराटीचे कधीच कमी पडू देणार नाही. तुम्ही आयुष्यात नवनवीन यशाची शिखरे गाठाल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular