नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मराठी नववर्ष गुढिपाडव्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढि पाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या नवीन वस्तूंची खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी या गोष्टी आवर्जून केल्या जातात. येत्या नवीन वर्षापासून कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे पाहूया
मेष रास – या राशीची येत्या नवीन वर्षात भरपूर प्रगती होणार आहे. आर्थिक लाभ होणार असून राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. या राशींचे चांगले दिवस सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे.
फक्त संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. करियर, विद्यार्थी, नोकरी, प्रमोशन, एखादी संधी किंवा व्यवसायाच्या शोधात असाल, तर अजून 4 ते 5 महिन्यांनी या गोष्टींचा विचार करू शकता. यशप्राप्तीचा काळ आहे. संकटातून मुक्त होणार आहात.
मिथुन रास – आतापर्यंत येणारी आर्थिक संकट दूर होणार आहे. आयुष्यातील चांगल्या दिवसांना सुरुवात होणार आहे. करियरसाठी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. मेहनत आणि संयमाची आवश्यकता आहे. वाणी गोड ठेवा. रागावर नियंत्रण ठेवल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
तूळ रास – समस्यांना तुम्ही हसतमुखाने सामोरे जाता. स्वत:चे दोष कोणावरही न लादणारी ही रास आहे. तूळ रास आता लवकरच प्रगतीच्या मार्गावर येणार आहे. कर्म, कष्ट याबरोबर तुमचे नशिबदेखील चमकणार आहे. पैसा, व्यवसाय, करियर, नोकरीसाठी तुम्ही बघत असलेली वाट तुमची यंदाच्या नवीन वर्षात संपणार आहे. आर्थिक, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या हे वर्ष या राशीच्या व्यक्तिंना यशदायी आहे.
कर्क रास – नशिबाला दोष देणे या राशीच्या व्यक्तिंनी बंद करावे. मनाजोगी नोकरी, आर्थिक लाभ, कामाकरिता बाहेरगावी प्रवासाचे योग आहेत. स्त्री, पुरुष आणि विद्यार्थी या सगळ्यांसाठी हे वर्ष भरभराटीचे आणि पदोन्नतीचे जाणार आहे.
सिंह रास – सिंह राशीचे सगळे दिवस चांगले आहेत. या राशींच्या व्यक्तिंसाठी यंदाच्या वर्षाप्रमाणेच पुढचे वर्षही चांगले जाणार आहे. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. याकरिता तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून बोला. स्पर्धापरीक्षेतही सिंह राशीच्या व्यक्तिंना लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक उन्नती होणार आहे, मात्र आलेला पैसा कसा राखून ठेवायचा याची काळजी घ्यावी.
वृश्चिक रास – कितीही कष्ट केले तरीही त्याचे चिज होत नाही, ही वृश्चिक राशीची तक्रार यावर्षी समाप्त होणार आहे. कष्टाचे चिज होणार आहे. तुम्हाला यश मिळणार आहे. व्यवसाय, नोकरीत करत असलेल्या प्रयत्नात आघाडीवर जाण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. यशप्राप्ती होऊन पैसा चांगला मिळणार आहे आणि निश्चितच कामाचे फळ मिळणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तिंना काळजी करण्याची गरज आहे. तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मीन रास – आत्मविश्वास मिळवण्याचे चांगले योग जुळून आले आहेत. लोकांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास पुन्हा परत मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या व्यक्तिंना सामाजिक क्षेत्रात भरपूर यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पती-पत्नी, प्रियकर, प्रेयसी सगळ्यांसाठी हे वर्ष कमालीचे ठरणार आहे.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!