Saturday, December 2, 2023
Homeआध्यात्मिकमहाशिवरात्रीला चुकूनही शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करु नका..

महाशिवरात्रीला चुकूनही शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करु नका..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याचे चतुर्दशी तिथी भगवान शिवशंकरांना समर्पित असते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी भाविक पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा करतात.

यावेळी महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला आलेली आहे. या पवित्र दिवशी रुद्राभिषेक केल्यास मनोकामना पूर्ण होतात. त्याबरोबरच शिवलिंगावर काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्या तर सर्व प्रकारचे रोगही दूर होतात. पण काही वस्तू अशा आहेत. या महाशिवरात्रीला शिवलिंगावरती कधीही अर्पण करू नये.

कोणत्या आहेत त्या वस्तू चला जाणून घेऊया. मित्रांनो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही शिवलिंगावरती तुळशीची पाने कधीही अर्पण करू नये. तसेच पाकिटातील दूध देखील अर्पण करू नये. शक्यतो थंड दूधच महादेवांना अर्पण करावे.

त्याबरोबर भगवान शिवशंकरांना चुकूनही चंपाचे फूल अर्पण करू नये. तांदुळाचा चुरा तो सुद्धा कधी अर्पण करू नये आणि तुटलेले बेलाचे पानही महादेवांना कधीही अर्पण करू नये आणि अर्थात शिवलिंगावर कुंकूवाचे गंध देखील कधी लावू नये.

ज्योतिषशास्त्रानुसार 2023 मध्ये महाशिवरात्र 18 फेब्रुवारी 2023 रोजी येत आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8:02 पासून सुरू होईल आणि 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4:18 पर्यंत चालेल.

उदयतिथीनुसार 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी होणार आहे. यामध्ये 18 आणि 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12.16 ते 1.6 मिनिटांपर्यंत निशीथ काल पूजा मुहूर्त असेल. दुसरीकडे, महाशिवरात्री व्रताचा पारण मुहूर्त 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.57 ते दुपारी 3.33 पर्यंत असेल.

धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरती नेहमी पंचामृत अर्पण करावे. दूध, दही, शुद्ध तूप, मध आणि साखर या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. महाशिवरात्रीला जो कोणी 4 प्रहरांची पूजा करतो,

भोलेनाथांना पहिल्या प्रहरामध्ये पाण्याने दुसऱ्या प्रहरामध्ये दही, तिसऱ्या प्रहरात तूप आणि चौथ्या प्रहारात मधाने अभिषेक घालतो परमेश्वर त्यांचे सर्व दुःख दूर करतात. या दिवशी भक्तांनी ही पूर्ण भक्तिभावाने व्रत करावे. चारही प्रहरांची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून उपवास सोडावा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular