Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकपापमोक्षिणी आषाढी एकादशी.. हे एक व्रत करा, समस्त पापातून मुक्ती मिळणार .!!

पापमोक्षिणी आषाढी एकादशी.. हे एक व्रत करा, समस्त पापातून मुक्ती मिळणार .!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… नेहमीप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण राज्यभरातून लाखो वारक री पायी चालत पंढरपुरात येतात. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संतांच्या पालख्या वारी आणि दिंडीसह भूवैकुंठात दाखल होतात.

एकादशीच्या या व्रताबद्दल – आषाढी एकादशी म्हटली की पंढरपूरमधील लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

आषाढ महिण्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संत महंतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची पूजा करून उपवास करतात.

एकादशीची कथा – आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला शंखासुर दैत्याचा वध झाला असे धार्मिक शास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे याच दिवसापासून भगवान चार महिने क्षीर समुद्रात निद्रेत जातात आणि

कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. धार्मिक मान्यतांनुसार एकादशीची अशी एक कथा आहे की एकेकाळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊल शिव प्रभूंनी त्याला तू मृत्यू कोण त्याही देवाकडून होणार नाही, परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल’ असा वर दिला.

या वरामुळे उन्मत झालेला मृदुमान्यने देवांवर आक्रमन केले. या परिस्थितीत सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे पोहोचले. परंतु त्यांनी स्वत: त्याला वरदान दिले असल्यामुळे त्यांना काहीही करणे शक्य नव्हते.

यानंतर सर्व देव शिवप्रभूंसह एका गुहेत जाऊन लपले. तेथे देवांच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली. या देवीचे नाव एकादशी होते. तिने मृदुमान्याचा वध करून सर्व देवांची सुटका केली. त्या दिवशी भरपूर पाऊस पडला आणि देवांना स्नान घडले.

तसेच देव गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. तेव्हापासून एकादशीला उपवास करण्याची प्रथा सुरू झाली. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.

या गोष्टी अवश्य करा – आषाढी एकादशी हे सर्वात पवित्र व्रत आहे या दिवशी उपवास केल्याने पुण्य लागते जर आपण उपवास करू शकत नसाल तर आपण गरजूंना अन्न वस्त्र दान करावे असे केल्याने आपणास उपवासाचे पुण्य लाभेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

आषाढी एकादशीला कोणती गोष्ट करू नये – प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. यातील एक एकादशी व्रत शुक्ल पक्षात असते तर एक कृष्ण पक्षात येते. धार्मिक मान्यतांनुसार एकादशीला पान खाणे, खोटं बोलणे, जु*गा*र खेळणे, म*द्य*पान करणे, मां**सा*हर घेणे या गोष्टी करु नयेत.

जर आपण या चुका करत असाल तर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतील. कारण सनातन धर्मातील हे सर्वात पवित्र व्रत आहे व या दिवशी आपण या चुका केल्या तर ते पाप समजले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular