Wednesday, May 22, 2024
Homeआध्यात्मिकपहीला श्रावण सोमवार.. भरभराटी, समृद्धीसाठी आज स्वामींची ही विशेष सेवा करा.. फक्त...

पहीला श्रावण सोमवार.. भरभराटी, समृद्धीसाठी आज स्वामींची ही विशेष सेवा करा.. फक्त 21 वेळा या मंत्राचा जप करा.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, हिंदू धर्मातील मान्यतेनुसार श्रावण सोमवारच्या दिवशी जी व्यक्ती भक्तिभावाने भगवान शिव शंकराची पूजा करते, त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टातून अवश्य मुक्ती मिळते. जे लोक श्रावण सोमवारच व्रत, उपवास करतात, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छांची आणि मनोकामना यांची पूर्तता होऊ शकते. त्यामुळे आपल्यापैकी अनेक लोक सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करीत असतात.

कारण सोमवार दिवस हा महादेवाचा दिवस मानला जातो, याचबरोबर श्रावणाचा पहीला सोमवार असल्यामुळे आज या दिवसाचे महत्त्व द्विगुणित झालेलं आहे. आजच्या दिवशी आपल्याला भगवान महादेवांच्या सेवेसोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे. याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. हा मंत्र जप करू शकतात. फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजे हा मंत्र जप करायचा आहे.

याचबरोबर ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका ठराविक वेळेत आपले हात-पाय स्वच्छ धुऊन, पवित्र झाल्यावर घरातील देवघरासमोर बसायचं आहे. म्हणजे स्वामींच्या समोर बसायचे आहे आणि अगरबत्ती दिवा लावायचा.

मग त्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, बरकतीसाठी आणि संकट, समस्या, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही हात जोडून पुढील मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र बोलायचा आहे. कारण हा श्री स्वामींच्या माहिती कोषातील विशेष मंत्र आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम दिगबराय नमः”
“ओम दिगबराय नमः”

हा मंत्र फक्त 21 वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही, मनोभावाने आणि विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा स्वामी पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील तसेच सर्व दुःख, अडचणीत संकटात समस्या दूर करण्यास मदत करतील, श्री स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. त्यामुळे आजच्या सोमवारच्या दिवशी श्री स्वामींची ही विशेष तेव्हा नक्की करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular