Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकपावन श्रावण सोमवार आज झोपण्यापूर्वी फक्त 21 वेळेस बोला ‘हा’ एक मंत्र...

पावन श्रावण सोमवार आज झोपण्यापूर्वी फक्त 21 वेळेस बोला ‘हा’ एक मंत्र सर्व मनोकामना पूर्ण होतील.. घरात भरभराटी येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे. आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे. आजच्या पहिल्या सोमवारपासून दररोज महादेवांची ही विशेष सेवा करा. रोज विशेष मंत्राद्वारे महादेवांना प्रसन्न करून घ्या. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

आपल्या घरामध्ये भरभराटी सुख समाधान समृद्धी येईल मित्रांनो एक ऑगस्ट पासून म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून हा मंत्र दररोज म्हटला तर महादेवांना आपण प्रसन्न करून घेणार आहात. हा मंत्र आपल्याला आपल्या घरामध्येच राहून देवघरासमोर दररोज म्हणायचं आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे.

हा श्रावण महिना महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये महादेवांची विशेष प्रकारे सेवा केली जाते. आणि महादेवांना प्रसन्न करून घेतले जाते. महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रांचा जप केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने महादेवांची पूजा देखील केली जाते. नावाप्रमाणेच महादेव हे भोळे महादेव आहेत ते आपल्या सेवेने लगेचच प्रसन्न होतात.

आणि आपल्या भक्तांना फळ देखील लगेच देतात. त्याचबरोबर महादेवांना बेलपत्र व फुले देखील अर्पण केले जातात. आणि महादेवांची कृपा मिळवू शकतात आपल्याला फक्त 21 वेळेस किंवा जास्तीत जास्त 108 वेळेस हा एक मंत्र म्हणायचा आहे.

म्हणजेच संपूर्ण एक जपमाळ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आपल्याला संपूर्ण एक माळ जप करणे शक्य नसल्यास कमीत कमी 21 वेळा तरी या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. महिला पुरुष किंवा विद्यार्थी वर्गाने जरी हा मंत्र जप केला तरी चालतो. किंवा घरातील एखाद्या सदस्याने या मंत्राचा जप केला तरी चालतो.

घरातील एखाद्या व्यक्तीने जरी या मंत्राचा जप केला तर याचे फळ संपूर्ण कुटुंबाला मिळते. आपल्याला या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळी आपण आपली देवपूजा करतो, त्यावेळी म्हणायचं आहे. देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे. आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.

या मंत्रजापासोबतच आपली जी रोजची नित्यसेवा आहे. ती नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे. श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारपासून ते श्रावण महिना संपेपर्यंत आपल्या ज्या नेहमीच्या सेवा आहेत. त्या सेवेबरोबरच आपल्याला ही देखील महादेवांची विशेष सेवा करायची आहे. आपण जो मंत्र म्हणणार आहोत, तो मंत्र महादेवांच्या अष्टनामावली मधील एक मंत्र आहे.

या नामावलीला शिवनामावली असे देखील म्हणतात तो मंत्र असा आहे. ‘ओम महेश्वराय नमः’ हा मंत्र आपल्याला कोणतीही काही न करता एकदम हळुवारपणे या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळा किंवा 108 वेळा करायचा आहे. हा मंत्र खूप चमत्कारी व प्रभावशाली मंत्र आहे.

या मंत्राचा जप केल्याने महादेवांची कृपा आपल्यावर होणार आहे. या मंत्राचा जप जर आपण संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्कीच महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular