Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिकपितृपक्षात मुलांवरून ओवाळून एक वस्तू घराच्या छतावर ठेवा.. वाईट नजर बाधा टळतील...

पितृपक्षात मुलांवरून ओवाळून एक वस्तू घराच्या छतावर ठेवा.. वाईट नजर बाधा टळतील पितृंचा आशीर्वाद राहील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो भाद्रपद पौर्णिमेपासून सर्वपित्री अमावस्येचा काळ हा पितृपक्ष समजला जातो. या दिवसांमध्ये पितरांसाठीची अर्पण तर्पण केले जातात पिंड दान केलं जातं, पितरांचे श्राद्ध केले जातात. जेणे करून पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतील. पितरांच्या कृपेनेच आपल्या जीवनामध्ये सर्व समस्या, संकटांचा नाश होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत.

ज्या लोकांवर पितर अप्रसन्न असतात त्यांच्या घरात नेहमी अशांती असते असमाधानकारक वातावरण असतं. अश्या कुटुंबातील व्यक्तीला प्रत्येक कार्ययात अपयश मिळत आणि म्हणूनच पितृपक्षात तिथीनुसार आपल्या सर्वांच्या घरी आपल्याला मृत लोकांच्या तिथीनुसार आपण श्राद्ध करत असतो. मित्रांनो, पितृपक्ष हा महिना फक्त पंधरा दिवसाचा महिना असतो.

आपण आपल्या गेलेल्या माणसांसाठी तिथीनुसार श्राद्ध घालत असतो. त्यांना जेवू घालत असतो. त्यांना प्रसन्न करत असतो. तर याच महिन्यात महिलांनी आपल्या मुलावरून ओवाळून ही एक वस्तू घराच्या छतावर ठेवावे आणि मित्रांनो जर तुमची मुलं कितीही मोठी असू द्या किंवा कितीही लहान असू द्या हा उपाय महिलांनी आपल्या मुलांसाठी करावा.

हा उपाय तुम्हाला पितृपक्षात पंधरा दिवसात कधीही तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी करता येतो. हा उपाय करण्यासाठी महिलांनी मिठा न घालता भात एक वाटी या प्रमाणात शिजवावा. आणि हा भात एका ताटलीत किंवा काढून तो आपल्या मुलांवरून ओवाळून घ्यावा. तर मित्रांनो आता हा ओवाळून कशाप्रकारे घ्यायचा आहे?

असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर, आपल्या मुलाला खुर्चीत/ सोप्यावर किंवा जमिनीवर बसून घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत असे गोल हे असे तीन वेळा करून हा भात आपल्या घराच्या छतावर कावळ्या साठी ठेवावा आणि जर एखाद्या महिलेला दोन किंवा दोन पेक्षा जास्त मुले असतील तर त्यासाठी वेगळा भात करण्याची गरज नाही. तोच भात प्रत्येक मुलावर ओवाळून ठेवू शकतो.

हा उपाय केल्याने तुमच्या मुलावर कोणतीही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. त्यांना कधीही पितृदोष लागणार नाही. त्यांच्यातुमचा मुलांना आशीर्वाद मिळेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये दररोज करायचा आहे मित्रांनो मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता अगदी विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा एक उपाय जर या पितृपक्षाच्या पंधराव्यामध्ये केला तरी यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर खुश होतील.

त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद ही तुम्हाला प्राप्त होईल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व पीडा दोष नकारात्मकता दूर होतील तर मित्रांनो हा एक छोटासा उपाय तुम्ही या पितृपक्षांमध्ये नक्की करून तुमच्या मित्रांना खुश करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular