Saturday, May 25, 2024
Homeआध्यात्मिकपितृपक्ष 2022 शिवलिंगावर ही एक वस्तू करा अर्पण.. सुख समृद्धी, पैसा, धनलाभ...

पितृपक्ष 2022 शिवलिंगावर ही एक वस्तू करा अर्पण.. सुख समृद्धी, पैसा, धनलाभ एवढा येईल की सांभाळणं होईल कठीण.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो पितृपक्षाचा महिना हा फक्त पंधरा दिवसांचा असतो. या महिन्यात आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही. या महिन्यात आपण जे आपले लोक आपल्याला सोडून कायमचे दूर निघून गेले आहेत त्या पूर्वजांना योग्य तिथीनुसार जेवू घालत असतो आणि त्यांचे श्राद्ध घालत असतो, त्यांचा आशीर्वाद मिळवत असतो.

जर आपले पित्र आपल्यावर नाराज झाले तर आपल्याला कोणत्याही कामात यश येत नाही. घरात पैसा टिकत नाही, सुख शांती येत नाही, तसेच आपल्याला कोणत्याही गोष्टीत समाधान लाभत नाही. आपल्याला आपल्या पितरांना कायम खुश ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे आपण या महिन्यात जर काही गोष्टी केल्या तर त्यामुळे आपले पितृ आपल्यावर नाराज होत नाही. आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही आणि असेल तरीही तो दूर होईल.

तर मित्रांनो महादेव देवांचे देव आहेत आणि जर आपण त्यांना प्रसन्न केलं तर ते आपल्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही. त्यामुळे पितृपक्ष मधे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने आपल्याला महादेवाचा आशीर्वाद तर मिळेलच सोबतच आपले पितृ पण खुश होतील. म्हणून आपल्याला या महिन्यात महादेव यांना दूध अर्पण करायचे आहे.

तसेच आपल्याला सोमवारी एक तांब्या शुद्ध पाण्यामधे दर्भाची काडी टाकून ते पाणी महादेव यांना अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील पितृ दोष नाहीसे होतील. आपल्याला आरोग्याविषयी काही त्रास असेल तर एक वाटी कच्चे दूध घेऊन त्यामधे थोडे काळे तीळ आणि जव टाकावे आणि हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे.

आता मित्रांनो आपल्याला जर पैश्यासंबंधी समस्या असतील तर एक तांब्या शुद्ध पाणी घेऊन त्यामधे एक चिमूट तांदळाचे पिठ आणि हळद घालून ते वडाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे. त्यांनतर त्या वडाच्या झाडाचे थोडे मूळ काढून घेऊन त्याला लाल धागा बांधायचा आहे आणि त्याला आपल्या जवळ ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्या ज्या काही पैशांच्या समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील. अतिशय प्रभावी असे हे उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की हे उपाय करून बघा.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular