Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकपूजा करताना घंटीचे महत्व काय असते.? घंटी किती वेळा वाजवावी.?

पूजा करताना घंटीचे महत्व काय असते.? घंटी किती वेळा वाजवावी.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, जेव्हा आपण देव पूजा करतो तेव्हा घंटानाद अवश्य करत असतो. हिंदू शास्त्रांमध्ये व अनेक पुराणांमध्ये घंटानाद बद्दल सांगण्यात आलेले आहे. जेव्हा आपण देवघरामध्ये पूजा करत असतो अशावेळी घंटानाद करतो. आपल्या देवघरामध्ये घंटी असते. तिच्या सर्वात वरच्या टोकाला गरुडाचे प्रतिमा असते म्हणून याला गरुड घंटा असे सुद्धा म्हणतात.

या घंटेचा नाद केल्याने आपण भगवंतांना आवाहन करत असतो आणि भगवंत आपल्या घरी येतात. असा भास सुद्धा आपल्याला होत असतो. जेव्हा आपण भगवंताची विधिवत पूजा अर्चना करत असतो. अशावेळी घंटानाद अवश्य करायला हवा. त्याचबरोबर जेव्हा आपण आरती करतो अशा वेळीसुद्धा घंटानाद करायला हवा.

मित्रांनो जेव्हा आपण आरती करतो तेव्हा घंटानाद करायला हवा. आणि आपल्या भारतीय परंपरा मध्ये अनेक गोष्टींना महत्त्व दिले गेले आहे. मंदिर प्रवेशाच्या वेळी देवासमोर लावण्यात आलेला मोठा घंटा आपण नेहमीच पहात असतो. पण मंदिरात घंटा का लावत असावा? याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच! देवाच्या दर्शनाअगोदर देवळात घंटा वाजवूनच प्रवेश केला जातो.

तसेच आरती ओवाळताना घंटानाद केला जातो. आपण आपल्या घरामध्ये देखील पुजा-अर्चना करताना एक छोटी घंटी वाजवत देवपूजा करत असतो. मित्रांनो देवपूजा करताना घंटीनादाचे महत्व काय आहे हे मात्र आपल्याला माहित नसते. घंटानाद व देवपुजा यांबद्दल पौराणिक तथ्य व यामागचे शास्त्र आपल्याला माहीत नसते.

मित्रांनो मंदिरात किंवा देवालयात जाताना आपण मंदिराबाहेर असलेली घंटा वाजवल्याशिवाय पुढे जात नाही. आणि मंदिरप्रवेशाबाबत अनेक रीति-रिवाज आहेत. त्यामागे हिंदू धर्मशास्त्रानुसार शास्त्रीय कारण देखील सांगितले गेले आहे. तसेच आपण घरात रोजची देवपूजा करताना घरामध्ये घंटी वाजवत असतो. त्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे. मित्रांनो आज आपण देवालयात घंटा असण्याचे व घरात देवघरामध्ये पूजा करताना घंटी वाजवण्याचे कारण व त्याचे महत्त्व सांगणार आहोत.

मित्रांनो आपल्या पुराणकथांनुसार असे म्हटले जाते की, या सृष्टीचे निर्माण झाले तेव्हा, जो ध्वनी निर्माण झाला होता. तो घंटानादासारखा होता. सृष्टीच्या प्रारंभाचे प्रतीक म्हणून घंटेचा सन्मान केला जातो. यामुळे जेव्हा आपण रोज मंदिरामध्ये किंवा घरामध्ये घंटानाद करून आरती करतो. तेव्हा आपण ईश्वराशी जोडले जातो.

अशी पवित्र भावना यामागे आहे. घंटानादामुळे सकारात्मक उर्जा लहरी ध्वनीरुपाने आपल्या आजूबाजूला प्रवाहित होतात. पुराणशास्त्रांमध्ये “गरुड घंटी” ला महत्त्व दिले आहे.ही गरुन घंटी छोट्या आकाराची असते व ती प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये पूजेकरता वापरली जाते.

मित्रांनो ही गरुड घंटी पुजा करताना वाजवल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतात आणि घरामध्ये सलोख्याचे वातावरण व आनंद निर्माण होते. घरातील लोकांमध्ये प्रेम, आपुलकी वाढते. मंदिरांमध्ये वाजवली जाणारी घंटा काळाचे प्रतिक मानले जाते.

कारण मंदिरामधील घंटा आकाराने खूप मोठी असते व या घंटेचा आवाज काही किलो मीटर पर्यंत जाऊ शकतो. मंदिरातील घंटेच्या नादामुळे मृत्यू देखील दूर पळू शकतो अशी धारणा आहे. दररोज मंदिरातील घंटा वाजवल्यामुळे व्यक्तीची मानसिक धैर्य वाढते. व्यक्ती मानसिक रूपाने मजबूत होतो.

त्यामुळे शत्रू देखील व्यक्तीवर वरचढ बनत नाही. तर हे घंटानादाचे महत्व व देवळात व घरात घंटा असण्याचे शास्त्रीय कारण! ज्यामुळे हिंदू धर्मामध्ये घरातील देवपुजा करताना घंटी वाजवतात व मंदिरामध्ये मोठा घंटानाद केला जातो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular