Sunday, December 3, 2023
Homeवास्तूशास्त्रप्राजक्त घरात घेऊन येतो सुख आणि समृद्धी.. घरासमोर पारिजातक असेल तर नक्की...

प्राजक्त घरात घेऊन येतो सुख आणि समृद्धी.. घरासमोर पारिजातक असेल तर नक्की वाचा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, आपल्या आसपास विविध प्रकारचे वनस्पती व झाडे असतात. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. ही वनस्पती, झाडे आपल्याला फायदेशीर असतात. मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये देखील अनेक झाडांना खूपच महत्त्वाचे स्थान दिले जाते. अशाच एका झाडाचे फायदे आणि उपाय आपण पाहणार आहोत. मित्रांनो ही वनस्पती खूपच फायदेशीर आहे. चला तर मग पाहूया हे झाड नेमके कशाचे आहे आणि त्याचे उपाय व फायदे कोणते आहेत.

मित्रांनो, पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि नाजूक केशरी देठ व सुगंधाची लयलूट करणारे झाड असते प्राजक्ताचे. त्यालाच संस्कृतमध्ये पारिजात असे म्हणतात. मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असं मानलं जातं की, पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले होते आणि हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला त्यानंतर कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे. तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात, अशी ही म्हणच पडली.

त्याचबरोबर मित्रांनो पारिजात हे झाड भारतात उगवणारे एक औषधी झाड आहे आणि त्याचबरोबर ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक असतो. आपल्या भारतामध्ये हे झाड जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवणारा हा पारिजात, प्राजक्त म्हणूनही ओळखला जातो. परंतु आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो.

मित्रांनो, अशा या प्राजक्ताच्या म्हणजे परी जातकाच्या झाडाचे आपल्या वास्तुशास्त्र मध्ये अनेक फायदे सांगितलेले आहेत. आपल्या वास्तुशास्त्रानुसार ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असते, त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात आणि त्याचबरोबर जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो, तिथे लक्ष्मी वास करते. कारण ही फुले तिला अतिशय प्रिय आहेत. म्हणून लक्ष्मी पूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलेच देवीला अर्पण केली जातात.

मित्रांनो, प्राजक्ताच्या सुगंधात तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे. त्याचा सुगंध तुमचे मन शांत करतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते आणि निरोगी तसेच दीर्घायुष्य प्राप्त होते. त्याचबरोबर प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात, तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते.

त्याचबरोबर या प्राजक्ताच्या झाडाचे फुल महादेव आणि श्रीहरी विष्णू यांना खूप प्रिय आहे. म्हणूनच आपण जर महादेवांना सोमवारच्या दिवशी आणि श्री विष्णू यांना गुरुवारच्या दिवशी प्राजक्ताच्या झाडाची फुले अर्पण केले आणि आपल्या मनात असणारी इच्छा त्यांच्या समोर मांडली तर यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात.त्याचबरोबर ज्या मुला-मुलींच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होत आहेत अशा मुला-मुलींनी प्राजक्ताच्या झाडाची पूजा करावी आणि त्याचबरोबर प्राजक्ताच्या झाडाखाली वाळूचे किंवा मातीचे शिवलिंग तयार करावे.

मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रा बरोबरच आपल्या आयुर्वेदामध्ये हि या झाडाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. आपल्या आयुर्वेदानुसार हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5 – 6 फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय आहे, परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येतो. त्याची फुले, पाने आणि साल औषध म्हणून वापरली जातात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular