Thursday, June 20, 2024
Homeआध्यात्मिकपुजेमध्ये रांगोळीचे महत्त्व काय.? दारामध्ये रांगोळी का काढावी.?

पुजेमध्ये रांगोळीचे महत्त्व काय.? दारामध्ये रांगोळी का काढावी.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, प्रत्येक घरामधील स्त्रिया या आनंदाच्या प्रसंगी किंवा सणासुदीला दाराबाहेर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळी ही सणांना आवर्जून काढली जाते. वेगवेगळ्या डिझाईन्स काढून त्यात रंग भरले जातात. त्यामुळे घराची आणि दाराची शोभा वाढते. भारताच्या वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जाते. गावाकडे अंगण, तुळशी वृदांवन असल्यामुळे तुळशीशेजारी आणि अंगणात रांगोळी काढली जाते. पण शहरांमध्ये रांगोळी काढण्याची फारशी पद्धत नाही. पण संस्कृतीचा मान राखत हल्ली अनेक जण उंबऱ्यावर का होईना एखादे स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या रांगोळी काढण्यामागेही एक श्रद्धा असते. दाराबाहेर नेमकी रांगोळी का काढली जाते. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया रांगोळी काढण्याचे नेमके कारण.

मित्रानो संस्कृतात रांगोळीला ‘रंगवली’ असे म्हणतात. सौंदर्य आणि मंगलसिद्धीचे प्रतीक रांगोळी मानली जाते. रांगोळीच्या विशिष्ट दगडांचा बुक्की करुन त्यापासून वेगवेगळे आकार तयार केले जातात. रांगोळी हे शक्ती आणि उदारतेचे प्रतीक आहे. रांगोळी काढण्यामागे शक्ती, उदारपणा आणि नशीब फळफळवणे हा हेतू असतो. शिवाय मांगल्याचे लक्षण म्हणून रांगोळी काढली जाते. अशुभनिवारक अशी ही रांगोळी असल्यामुळे सगळ्या नकारात्मक उर्जांना दूर करुन सकारात्मक उर्जा आणते. ज्यामुळे घरात आनंदी आनंद राहतो असे मानतात. हिंदू धर्मातच नाही तर पारशी धर्मातही रांगोळी ही याच कारणांसाठी काढली जाते.

आणि मित्रांनो रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात आणि मित्रांनो प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीयांच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात.

आणि मित्रांनो दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात आणि रांगोळी काढण्यासाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नसते. रांगोळीची पूड सामान्यपणे भरभरीत असते. त्यामुळे चिमटीतून ती सहजपणे सुटते. रांगोळीतील आकृतिबंध धार्मिक प्रतीकांचे निदर्शक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्ररेषा ही अधिक कलात्मक मानली जाते. अशा वक्ररेषा आणि बिंदू, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांतून विविध नक्षीदार आकृतिबंध साधले जातात.

मित्रांनो यांशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीतून मोर, कासव, कमळ इत्यादिंच्या प्रतिमा रेखाटल्या जातात. ठिपक्यांची रांगोळी आकर्षक असते आणि हिंदू, जैन व पारशी या धर्मात रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रदत मानलेली आहे. श्री आनंदघनराम रांगोळीचं तात्विक रहस्य विशद करताना लिहितात, ‘केरसुणी फिरवताना किंवा सारवताना जमिनीवर सूक्ष्म रेषा निर्माण होतात. त्यात एक प्रकारचं कंपन असतं. या रेषा अनियमित असल्याने त्यांचं कंपनही अनियमित असतं. हे अ​​निष्ट कंपन टाळण्यासाठी सारवलेल्या जमिनीवर कोन आणि शुभ चिन्हं व्यवस्थित रूपाने रांगोळीच्या माध्यमाने काढली की झाडल्याचे व सारवल्याचे अशुभ परिणाम दूर होऊन शुभ परिणामांची प्राप्ती होते.’

रोज देवापुढे आणि घराबाहेर देवीची पावलं रेखाटावीत. देवीची पावलं रेखाटताना उजवं पाऊल पुढे तर डावं पाऊल जरासं मागे काढलं पाहिजे. डाव्या पावलावर हळद वाहावी. उजव्या पावलांवर कुंकूसोबत शंख, स्वस्तिक आणि कमळ रेखाटावं आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी कोणत्या दिवशी आणि कुठे कोणती रांगोळी काढावी याचेही नियम होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular