Thursday, December 7, 2023
Homeलाइफस्टाइलपुरुषांना आणि स्त्री दोघांना चुंबन का घ्यावसं वाटतं.? जाणून घ्या किस चा...

पुरुषांना आणि स्त्री दोघांना चुंबन का घ्यावसं वाटतं.? जाणून घ्या किस चा किस्सा..

स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… जगभराचा विचार करता ओठांनी ओठावर केलं जाणारं किसिंग ही पद्धत आपल्याला वाटते तेवढी सगळीकडं रूढ नाही. पण मग मानवाच्या किसिंगच्या विविध प्रकारांवरून या क्रियेत एवढं महत्त्वाचं असं काय आहे, याचा शोध घेता येऊ शकतो का?

जगभरातील एकूण संस्कृती किंवा समाजांचा विचार करता त्यापैकी जवळपास अर्ध्या भागात लिप टू लिप किस केलं जातं. जगभरातील 168 संस्कृतींच्या अभ्यासावरून हे तथ्य समोर आलं आहे.लास वेगासमधील नेवाडा विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक विल्यम जानकोविक यांनीही याबाबत अभ्यास केला आहे.

त्यानुसार केवळ 46 टक्के लिप टू लिप किस या रोमँटिक म्हणजे युगुलानं प्रेमाच्या भावनेनं केलेल्या असतात.उर्वरित लिप टू लिप किसमध्ये एकमेकांची भेट घेताना किंवा आई वडिलांनी मुलांना केलेल्या किसचा समावेश होतो. आपल्याला अगदी लहान बाळ असताना किंवा जन्मजात ओठांनी स्पर्श करण्याची आवड आणि सवय असते.

यावरून मानवाला किस करण्याची गरज का भासते? या संदर्भातील दोन सिद्धांत समोर आले आहेत. त्यापैकी पहिली बाब म्हणजे, ओठांच्या मदतीनं आपण बालपणापासून आईचं दूध पित असतो.प्रत्येकाला अगदी जन्मजात त्याची सवय असते.

तसंच “प्रिमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर” या एका जुन्या पद्धतीमुळंही आई आणि बाळामध्ये लिप टू लिप किसची सवय रूढ झाली असावी असं म्हटलं गेलं आहे. या पद्धतीनुसार प्राचीन काळात आई ही बाळं अगदी लहान असताना त्यांना अन्न भरवण्यासाठी स्वत: तोंडानं चघळून तोंडानंच अन्न बाळांच्या तोंडात भरवत असाव्यात अशी शक्यता आहे.

कारण आपले पूर्वज अशी ओळख असलेल्या चिंपांझी आणि माकडांच्या इतर प्रजातींमध्ये तसं आढळून आलं आहे. किसिंगची सुरुवात नेमकी कशी झाली असावी, यासंदर्भात बीबीसीच्या खालीली व्हीडिओमध्ये काही सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यात कपड्यांचा यामध्ये मोठा वाटा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular