Tuesday, March 5, 2024
Homeआध्यात्मिकपूर्वजांच्या फोटोंची घरातील योग्य दिशा कोणती.? घरात पितृंचे फोटो कुठे लावावेत.? पूजन...

पूर्वजांच्या फोटोंची घरातील योग्य दिशा कोणती.? घरात पितृंचे फोटो कुठे लावावेत.? पूजन कसे करावे.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आपण आपल्या पूर्वजांची मृत्यूनंतर त्यांच्या फोटोचे पूजन करत असतो. त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये लावत असतो. मात्र हे शरीर सुद्धा पूर्वजांनी सोडून दिलेला असतो. आपले पूर्वज या मनुष्य योनीचा त्या शरीराचा त्याग करून ते वरच्या योजने पोहोचलेले असतात. आणि ही वरच्या योनीत जाण्याचा कालावधी हा एक ते शंभर वर्षे इतका असतो आणि शंभर वर्षानंतर आपले पूर्वज पुन्हा भूलोकात जन्म घेत असतात.

मात्र आपण जर या त्यांची ही पूजा केली. त्यांचे फोटो लागलो तर , वरच्या योनित जाण्याची गती ही कमी होत असते आणि भूलोकात येण्याचा कालावधी हा जास्त वेळाने होत असतो. ही गती कमी का होते? कारण त्यांचा ही जीव हा या भूलोकात ओढला गेला जातो. त्यांनाही असे वाटत असते की, आपण भूलोकात परत जावे. त्यामुळे त्यांची ही गती कमी होत असते.

जे संत-महात्मे आहेत. त्यामध्ये शिवाजी महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत अशा लोकांनी आपल्या जीवनामध्ये कधीच आपल्या देहाची पर्वा केलेली नसते. ते समाजासाठी आपला देहत्याग करण्यासाठी देखील तयार असतात. अशा लोकांच्या आपण पुतळे बनवले, मुर्त्या बनवल्या किंवा फोटो बनवले आणि त्यांची पूजा केली तर, अशा लोकांच्या आत्म्याला त्यांच्या गतीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होत नाही.

कारण त्यांनी आपल्या देहाची पर्वा कधीच केलेली नसते. आणि हे व्यक्ती सोडून इतर व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींचे जर आपण फोटो मुर्त्या किंवा अन्य काही गोष्टी बनवल्या त्यांची पूजा केली तर, त्यांच्या गती मध्ये बाधा उत्पन्न होत असते. कारण त्यांना देहाची आस असते. महान व्यक्तींचे फोटो आपण कोणत्याही दिशेला तोंड करून लावू शकतो. परंतु आपल्या पितृ से फोटो हे आपण फक्त आणि फक्त दक्षिण दिशेला मुख्य करूनच लावावे.

जास्त करून आपल्या पूर्वजांचे फोटो लावत नाहीत. परंतु आपले भावना असेल, श्रद्धा असेल तर अशाच व्यक्तींचे फोटो लावावे. आपल्याला असे वाटत असेल की, कुठेना कुठे तरी आपले पूर्वज आपल्याला पहावेत. अशाच वेळी त्यांचे फोटो आपण घरात लावू शकतो. आणि हे फोटो लावत असताना फक्त तीन पिढ्यांचं फोटो घरात लावावे. त्या आधीच्या पिढ्यांचे फोटो विसर्जित करावे.

म्हणजेच आपले आजोबा-पणजोबा किंवा आपले वडील इत्यादींचे आपल्याला पण फोटो लावू शकतो. मग हे फोटो उत्तर दिशेच्या भिंतीला लावावे. म्हणजेच त्यांचे मुख्य दक्षिणेला होते. आणि त्यांची पूजा करीत असताना फक्त त्यांना चंदनाच्या फुलांचा माळ घालावी. इतर कोणत्याच सुगंधी फुलांची माळ घालू नये. सफेद रंगाच्या पुष्पांनी त्यांची पूजा करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular