Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकरडू नकोस हे ऐक.. आत्ता तुला दुःख देणारे सुद्धा सुखच देणार.!!

रडू नकोस हे ऐक.. आत्ता तुला दुःख देणारे सुद्धा सुखच देणार.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! काहीजण विचारतात की आमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, आमच्या सोबत लोकांनी खूप वाईट वागणूक केली आहे, जेव्हा कोणी आमच्यासोबत वाईट वागत असतं जाणून बुजून आम्हाला त्रास देत असतं, काही लोकं तर आमच्या सोबत चुकीचा व्यवहार करत असतात. आम्हाला खोटं बोलून फसवत असतात. आम्हाला खूप जास्त दुःख त्यांनी दिल आहे.

मग या सर्वांवर आपण करायचं काय, तर भक्तांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा कोणी आपल्या सोबत चुकीचा व्यवहार करत असतात, त्या क्षणी ते खुश नसतात, ते आपल्याला दुःख देत नाही तर ते स्वतः दुःखी असतात हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. खरंतर आपल्याला ते दुखवत नसतात. बघायला गेलं तर ते स्वतः जास्त त्यांच्या आयुष्यात दुःखी असतात, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे.

आपल्याला हे समजणं खूप अवघड आहे, कारण ती लोक काहीही बोलत असतात, आपल्याला हवं तसं दुखवत असतात. त्यांना इतरांच्या मनाला काय वाटेल हे जरा सुद्धा माहिती नसतं की यांच्या मनात कोणता दुःख आहे. पण भक्तांनो हे सर्व त्यांचं कर्म झालं. आपण त्यांच्यासारखे नाही आहोत. आपल्याला फक्त अशा वेळेला एकच गोष्ट बोलायचे आहे. मी शक्तिशाली आत्मा आहे. हे जे असे घाणेरडे वागत आहेत खोटं बोलत आहेत त्यांची वागणूक बरोबर नाहीये. ते हे सर्व करून मला नाही तर ते स्वतः स्वतःला दुःख देत आहेत.

हे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला त्यांना सन्मान आणि शुभेच्छांची शक्ती दिली पाहिजे. आपल्याला फक्त आणि फक्त दोन मिनिटं एका ठिकाणी शांत बसून असं बोलायचं आहे मग तुम्ही कुठेही असाल घरी असुद्यात, कामावर असू द्या किंवा कोणत्याही ठिकाणी असू द्या. कारण आपल्याला कधीही कोणीही दुखावू शकते, कधी आपलं कोणाशी भांडण होईल हे सांगता येत नाही.

कधी आपलं कामावर कोणासोबत तरी खटकतं किंवा कधीही रोडवर भांडण होतात किंवा कुठेही आपल्या सोबत कोणताही प्रसंग घडू शकतो आणि या सर्व गोष्टींमुळे आपण जास्त स्वतःला त्रास करून घेतो. पण आता आपल्याला हे थांबवायचा आहे. या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनाला फक्त एक सांगायच आहे. मी खूप शक्तिशाली आत्मा आहे, परमात्मा परमेश्वर माझ्यासोबत आहे. त्यांना आपण आपल्या मनातून सन्मान शक्ती आणि शुभेच्छा पाठवायचे आहे.

भक्तांनो फक्त आणि फक्त रोज दोन मिनिट हे केल्याने तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरात एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण झाली आहे. आपल्याला त्या लोकांचे विचार मनात न घेता आपल्याला फक्त एकच विचार करायचा आहे. माझ्यासोबत आहे परमेश्वराची शक्ती आहे. आपण तर परमेश्वराची चिमुकली बाळ आहोत. भक्तांनो ते वाईट वागणारे लोक या सर्व गोष्टी विसरले आहे पण आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.

त्यांच्या आयुष्यात काही जुन्या गोष्टी असतात त्या पण विसरू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्या गोष्टी मनातून जात नाही. पण आपल्याला आजपासून एक नवीन प्रयत्न करायचा आहे. आपण आत्तापर्यंत हेच बोलत आलो आहोत की मी या गोष्टी कधीच विसरू शकत नाही. त्याला एकच गोष्ट बोलायचे आहे की मी तुम्हा सर्वांना क्षमा केली आहे आणि आता या सर्व गोष्टी मी विसरणार आहे.

भक्तांनो आपल्याला वाटेल की हे इतका सोपं आहे का. तर हो खरंच हे सोप्प आहे कारण आपलं बोलणं कोण ऐकतं तर आपलं बोलणं आपला परमात्मा आपला परमेश्वर ऐकत असतो. आपलं मन आपलं बोलणं ऐकत असतं. भक्तांनो फक्त आणि फक्त आपण आपल्या मनाला आणि त्या परमेश्वराला या गोष्टी सांगायच्या आहे. आपण कसं दुसऱ्यांना समजावून सांगतो की कशाला त्या गोष्टींचा विचार करताय आता सोडून द्या. त्याच गोष्टीचा विचार करून काहीच होणार नाही अशाच प्रकारे त्यांना शक्ती देऊन त्यांना प्रेरणादायी करून आपण समजावून सांगत असतो.

तर मग आपल्या सोबत हे स्वतः करायला काय हरकत आहे. भक्तांनो आपण एक स्वतंत्र आत्मा आहोत. आपण एक शक्तिशाली आत्मा आहोत. आपल्या सोबत परमेश्वराची शक्ती आहे. फक्त हे आपल्याला सारखं सारखं किमान एक तासांनी 30 सेकंद वेळ काढून तरी बोलायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त एकदाच बोलून हे सगळं संपणार नाहीये तर आपल्याला हे रोज बोलायचं आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular