स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसा पासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो असे म्हणतात. आणि त्याच्या रथाला सात घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्य देवामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लागते, अशा त्या भास्करची ही पूजा आहे.
ही त्या तेजोमय प्रकाशाची पूजा आहे, सुर्य देवतेची पूजा आहे. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचं केवळ दर्शन घेतलं तरीही तो प्रसन्न होतो. त्याच दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे. रथसप्तमी चा दिवस म्हणजे तेजोपासनेचा दिवस…
रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर बोळक्यात किंवा सुपडात दुध उतू जाईपर्यंत तापवतात. आणि नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना ते वाटतात. दुधात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवताना किंवा खीर सुद्धा करतात. पण यामागे शास्त्र काय आहे चला तर जाणून घेऊयात…
मित्रांनो या दिवशी सूर्याच्या किरणांमधून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात. ज्या वेळी त्यांचा पृथ्वीच्या अंतर्गत कक्षेत प्रवेश होतो. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आप कणांशी त्यांचा संयोग घडून येतो. त्यामुळे किरणातील तेज मवाळत धारण करते.
हे तेजरूपी किरण आपतत्त्वत्मक तेजाच्या साह्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायूमंडलात प्रवेश करतात. वायूमंडलात प्रवेश करणारे किरण आकृष्ट करण्यासाठी सुगडाची रचना केलेली असते. ज्या वेळी गोवऱ्यातून निर्माण होणार्या सात्त्विक तेजरुप अग्नीने सुगड रुपी घटातील दूध तापवले जाते.
त्यावेळी दुधातून प्रक्षेपित होणार्या आपतेजतत्त्वात्मक लहरीचा या सुगडा भोवती पारदर्शक कोश बनतो. या कोशाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट झाल्याने या लहरींनी भारित दूध प्रसाद म्हणून भक्षण केल्याने जीवाच्या प्राणमय कोशाची शुद्धी होऊन त्याच्या शरीरातील पंचप्राण यांचे प्रदीपन होण्यास मदत होते.
अशा तऱ्हेने जीवाचे तेजोबल वाढल्याने त्याची आत्मशक्ती जागृत होते. पृथ्वी रुपी गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गोवाऱ्यांच्या साहाय्याने दूध तापवून त्यातून निर्माण होणारा आप आणि तेज लहरींचा कोश हा रथ सप्तमीच्या दिवशी पृथ्वीवर तयार होणाऱ्या वायुमंडलाशी सादरम दर्शवतो.
सुगडात तांदूळ घालून भात शिजवण्यापेक्षा आपतत्वातमक लहरींचे प्राबल्य असलेल्या दुधाचा उपयोग करणं जास्त इष्ट आणि फलदायी ठरतं. रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्यामागे अनेक वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. त्यातलाच आणखीन एक दृष्टीकोन म्हणजे कठिण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणे.
रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशी जवळ एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते, आणि ती खीर जळतेही. अशा चुलीवर जळालेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. वर्षांचे सर्व दिवस काही सारखे नसतात.
आनंद देणारे नाहीत काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले तरी त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण. मग शुक्लपक्ष सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेव यांचा जन्म झाला तो हा दिवस.
भगवान श्रीहरी श्री विष्णूंचे एक रूप म्हणजे साक्षात श्री सूर्यनारायण.. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी रूपाने प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवांमुळेच पृथ्वीवरील जीवन अस्तित्वात आणि अबाधित सुद्धा आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!