Friday, July 12, 2024
Homeआध्यात्मिकरविवारच्या दिवशी करा फक्त हे एक काम.. आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार...

रविवारच्या दिवशी करा फक्त हे एक काम.. आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असते. आरामदायी जीवन जगण्यासाठी लोक दिवस-रात्र मेहनत करतात. काही लोकांना त्यांच्या कर्मांनुसार यश मिळते तर काहींना निराशा. ज्योतिषांच्या मते, असे काही उपाय आणि युक्त्या..

ज्योतिषशास्त्रात वर्णन केल्या आहेत, ज्याचा अवलंब करून पैशाशी संबंधित अडचणी आणि जीवनात येणारे अडथळे दूर करता येतात. आयुष्यात संपत्ती, प्रगती आणि सुख-सुविधा मिळवण्यासाठी रविवारी करावयाचे उपाय जाणून घ्या – जिवनात अमाप संपत्ती आणि ऐश्वर्याची आवड कोणाला नाही. प्रत्येकाला असे वाटते की त्याला इतके पैसे मिळाले पाहिजेत की तो त्याच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण करू शकेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती दररोज मेहनत करते जेणेकरून त्याची शर्यत लवकरात लवकर संपेल.

पण बऱ्याच जणांना असे म्हणताना ऐकले जाते की अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही, किंवा त्यामागचे कारण त्यांना कळत नाही. तर आता प्रश्न असा आहे की, असे का घडते, कठोर परिश्रम करूनही व्यक्तीला योग्य ते फळ का भेटत नाही. वास्तविक, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, याचे कारण कधीकधी आपल्या जीवनात निर्माण झालेले वास्तु दोष असतात. ज्यामुळे जीवनात प्रगती करणे अवघड होते. हे तुमच्यासोबतही घडत आहे का?

तर आता काळजी करण्याचे काहिच कारण नाही. आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगू की तुमची ही समस्या लवकरच संपेल. ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला खुप नाही पण थोडे अजून प्रयत्न करावे लागतील. होय, ज्योतिषशास्त्रात दोन विशेष उपाय सांगितले गेले आहेत, जे रविवारी केले तर आयुष्यात पैशांची कधीच कमतरता भासणार नाही. तर दुसरीकडे, तंत्रशास्त्रानुसार, हे उपाय धनप्राप्तीसाठी रामबाण उपाय मानले जातात.

उलट असे म्हटले जाते की हा एक यशस्वी उपाय आहे. ज्या व्यक्तीने या उपायाचा आतापर्यंत उपयोग केला आहे, ते सूर्य देवाच्या कृपेने नक्कीच खूप श्रीमंत झाले आहेत. चला तर मग ते उपाय जाणून घेऊया.

संपत्ती आणि समृद्धीसाठी ज्योतिष उपाय – चांगले आयुष्य जगण्यासाठी पैसा असणे खूप महत्वाचे मानले जाते. पैसा आपल्याला केवळ चांगले आयुष्य देत नाही, तर समाजात आपला सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करतो. ज्या व्यक्तीकडे जास्त पैसा आहे, त्याला समाजात खूप आदर आहे. पैसे मिळवण्यासाठी लोक काय करतात?

अशा स्थितीत जर तुम्ही रविवारी काही खास उपाय करुन पाहिले तर तुमच्या घरात सुख समृद्धीबरोबरच पैशाचा पाऊस पडू शकतो. तुम्हाला आयुष्यात सुख आणि समृद्धीसह संपत्ती मिळण्याची इच्छा आहे का? जर होय, तर रविवारी हे उपाय नक्की करून पहा. विश्वास ठेवा हे उपाय तुमच्या आयुष्यात आनंद भरतील.

शनिवारी रात्री झोपताना पलंगाच्या तळाशी (उजव्या बाजूला) तांदूळ किंवा गव्हाचा ढीग करुन त्यावर गाईच्या कच्च्या दुधाचा भरलेला एक ग्लास ठेवा. यानंतर, रविवारी सकाळी 4 वाजता अंघोळ करुन, स्वच्छ पांढरे कपडे परिधान करा आणि सूर्योदयापूर्वी, दुधाचा ग्लास घ्या आणि जवळच्या बाभूळाच्या झाडाला अर्पण करा.

हे लक्षात ठेवा की तेथे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत. असे मानले जाते की हा उपाय कमीतकमी तीन रविवारी केला पाहिजे, त्याचा अवलंब केल्याने दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. 

असे मानले जाते की रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते. ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शिव मंदिरात माता गौरी आणि भगवान शंकर यांना रुद्राक्ष अर्पण केल्यानेही लक्ष्मी माता प्रसन्न होतात. यामुळे आपल्या पैशाशी संबंधित समस्या संपतात.

याचबरोबर घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी मातेचे आशीर्वाद राहण्यासाठी रविवारी आदित्य स्तोत्राचे पठण करणे लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की रविवारी कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी काहीतरी गोड खाऊन पाणी प्यावे.

ज्योतिषांच्या मते, रविवारी, आपली इच्छा एका पानावर लिहून, ते पान वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे मानले जाते की असे केल्याने इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते.

तसेच, रविवारी कोणत्याही महत्वाच्या कामासाठी निघण्यापूर्वी गाईला पोळी द्यावी. असे मानले जाते की असे केल्याने त्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.

श्रद्धेनुसार देवी लक्ष्मी पाण्यात वास करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही रविवारी नदी किंवा तलावात राहणाऱ्या माशांना खायला दिले तर तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते.

हिंदू धर्मात गायीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. मान्यतेनुसार, गौ मातेच्या शरिरात 33 कोटी देवता वास करतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्या गाईला रविवारी तूपाची पोळी खाऊ घातली तर सर्व देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर राहू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular