Thursday, December 7, 2023
Homeराशी भविष्यरोज रात्री झोपताना भाजलेल्या लसणीची एक कळी खा.. फायदे बघून आश्चर्यचकीत व्हाल..

रोज रात्री झोपताना भाजलेल्या लसणीची एक कळी खा.. फायदे बघून आश्चर्यचकीत व्हाल..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! आज मी तुम्हाला ह्या लेखाच्या आधारे आपले आयुर्वेदिक पुस्तक “अष्टांगहि्रदम”च्या माध्यमातून भाजलेल्या लसणीची एक कळी तुम्ही जर रात्री झोपायच्या आधी नियमित खाल्ली, तर त्यामुळे कोणकोणत्या भयंकर अशा गंभीर रोगापासून तुम्हाला फायदा होऊ शकेल त्याची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. म्हणून माहिती शेवटपर्यंत जरूर बघा. आवडली तर लाईक व शेअर करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी.

लसूण गुणधर्म – भाजलेली लसूण किंवा कच्ची लसूण कोणी कोणी खाल्ली पाहिजे व कोणी ह्याचे सेवन करू नये ह्याची माहिती असणे खूपच जरुरी आहे. मित्रांनो, लसूण ही तामसिक भोजन ह्या गटात येते. म्हणजेच लसुणीची प्रकृती गरम आहे. जे लोक मेडिटेशन (ध्यानधारणा) करतात, हटयोगची कोणतीही प्रक्रिया करतात त्यांनी लसूण अजिबात खाऊ नये. कारण लसूण प्रयोग केल्यामुळे किंवा खाल्ल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन (एकाग्रता) कमी होते.

शारीरिक रोग तर मुळापासून समाप्त होतात. मी तुम्हाला हृदय, कोलेस्ट्रॉल, वजन कमी करण्यासाठी, पुरुषांमधील लैंगिक कमजोरी, वीर्याची कमतरता हे दूर करण्यासाठी लसूण खूपच फायदेशीर आहे. परंतु जी व्यक्ती ध्यानधारणा करते, हटयोग्य प्रक्रिया करतें त्यांनी मात्र लसूण प्रयोग करू नये. कारण लसूण शरीरात रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत करते.

मेंदूमध्ये आपली जी नस असते, ती खूप बारीक असते, त्यामध्ये जर रक्तप्रवाह वेगाने झाला, तर ते नुकसानकारक असते. जर तुम्ही लसणीचा प्रयोग केला तर नियमित किंवा रोज करू नका, कारण तुमची गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता,एकाग्रता कमी होते. आठवड्यातून 1 ते 2 वेळा लसूण तुम्ही वापरू शकता. आता जाणून घेऊया आपले आयुर्वेदिक पुस्तक “अष्टांगह्रिदम ” मध्ये लसणीचे कोण कोणते फायदे सांगितलेले आहेत.

भाजलेल्या लसणीचे फायदे – लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स, चांगल्या दर्जाचे प्रोटीन, बीटा कॅरोटीन, मिनरल्स व व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच ह्यामध्ये सल्फर व फॉस्फोरस, आर्यन मुबलक प्रमाणात असते. कोणत्याही प्रकारची पुरुषांमध्ये असलेली लैंगिक कमजोरी, कोणत्याही कारणामुळे झालेली वीर्याची कमतरता तर 1 पाकळी लसणीचा प्रयोग तुम्ही जरूर केला पाहिजे.

प्रयोग कशा पद्धतीने करायचा आहे – रात्री झोपायच्या आधी आपल्या चपातीच्या तव्यावर लसूण कळी साले काढून घेऊन ती तेल न वापरता भाजायची आहे. ती डार्क ब्राउन रंगाची झाली की खायची आहे. तुम्हाला वाटले तर रात्री ऐवजी तुम्ही सकाळी कोमट पाण्याबरोबर भाजलेली लसूण खाऊ शकता. विर्य दाट करण्यास ही मदत करते. त्याशिवाय, मित्रांनो, तुम्हाला किंवा घरात कोणालाही हृदयासंबंधी कोणतीही समस्याच असेल, किंवा जर तुमचे खराब कोलेस्ट्रॉल वाढले आहे, तर लसणीच्या कळीचा प्रयोग तुम्ही जरूर केला पाहिजे.

स्वप्नदोष – स्वप्नदोषासाठी पण रात्री झोपायच्या 15 ते 20 मिनिटे आधी ही लसूण पाकळी खायची आहे. त्याशिवाय खराब कोलेस्ट्रॉल कमी करून, रक्त पातळ करते, रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी एक भाजलेली लसूण कळी रोज खायची आहे.

योग्य रक्ताभिसरण जरुरी – आपल्या शरीरात आजकाल रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नाही, कारण आपण व्यायाम, वॉकिंग, जॉगिंग, योगा काहीही करत नाही. वाग्भट ऋषी म्हणतात, कि रक्ताभिसरण आपल्या शरीरात तेव्हाच योग्य पद्धतीने होते, जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम करतो. व्यायाम केल्यामुळे शरीरातील एक एक कोशिका म्हणजेच सेल्स क्रियाशील होते. आपण आपली रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य ठेवणे जरुरी आहे.

वजन कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर – जर तुम्ही 1 लसूण कळी भाजून सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर सेवन केली, ज्या पाण्यात तुम्ही मध, लिंबूरस टाकू शकता ते पाणी व बरोबर लसूण कळी जर चावून खाल्ली, तर वजन वेगाने कमी करण्यास ती मदत करते. पण त्याबरोबर व्यायाम जरुरी आहे. हटयोग्य प्रक्रिया तुम्ही करू शकता. रनिंग, जॉगिंग तुम्ही करू शकता. हिरव्या गवतात अनवाणी तुम्ही चालू शकता. धावू शकता कारण घाम येणे खूपच जरुरी असते.

त्याशिवाय भाजलेल्या लसणीचा प्रयोग थंडीच्या दिवसात पोटात उष्णता उत्पन्न करते. जठराग्नी मजबूत करण्यास व पचनशक्ती वाढविण्यास लसूण मदत करते. उन्हाळ्यात मात्र लसणीचा प्रयोग कमीत कमी करा. कारण ही पित्त व उष्ण प्रकृतीची आहे. हाडांसाठी पण लसणीचा वापर उत्तम आहे. आठवड्यातून 2-3 वेळा लसणीचा प्रयोग करा, त्यामुळे हाडे मजबूत होतात.

रक्ताची कमतरता – ज्यांना रक्ताची कमतरता आहे, थकवा येतो, त्यांनी लसणीचा प्रयोग जास्त करू नये. सकारात्मक वस्तू जसे की मध, ड्रायफ्रुट्स, हिरव्या भाज्या, ताजी फळे ह्याचा वापर अशा लोकांनी जास्त करावा. त्यामुळे शरीरात शक्ती व ताकद येईल.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular