Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकसफला एकादशी.. हे करा नोकरी आणि व्यवसायात सफलता नक्की.!!

सफला एकादशी.. हे करा नोकरी आणि व्यवसायात सफलता नक्की.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! तुम्ही एकादशीचा व्रत करता का? एकादशीच्या दिवशी उपवास करता का? करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही या सफला एकादशीला म्हणजेच 19 तारखेला जी एकादशी येते आहे त्या एकादशीला मात्र काही उपाय नक्कीच कर. काय आहे या एकादशीमध्ये विशेष आणि कशा प्रकारचे उपाय करायचेत आणि ते उपाय केल्याने काय होणारे तर यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळणारे मग ते काम कुठल्याही प्रकारच असो.

या एकादशी चे व्रत केल्यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसायातही सफलता मिळते. सफला एकादशीच व्रत केल्याने प्रत्येक कामात सफलता मिळते आणि म्हणूनच तिला सफला एकादशी चे व्रत म्हटलं जातं. हे व्रत केल्याने आयुष्यच रक्षण होतं. या व्रतामुळे मनुष्याला त्याच्या प्रत्येक कामात यश मिळतं. श्रीहरींच्या कृपेने माणसाला बहुतेक सुख आणि समृद्धी सुद्धा मिळते. यावेळी 19 डिसेंबर 2022 रोजी ही एकादशी आलेली आहे आणि या दिवशी उपवास केला जाईल.

या एकादशीच्या दिवशी तुम्ही कुठलाही प्रयोग केला तर तो यशस्वी होतो. या दिवशी व्रत केल्याने धनलाभ होतो. व्यापारात लाभ होतो. संतती होण्यामध्ये अडचणी येत असतील तर त्याही अडचणी दूर होतात. मुलांचं शिक्षण चांगलं होतं. नोकरीत यश मिळतं. अशी ही आहे सफला एकादशी. या दिवशी काय करायचं तर श्रीहरींची पूजा करावी. एकादशीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी श्रीहरींची पूजा करावी कपाळावर चंदन लावावं आणि चंदन लावून हरींची पूजा करावी.

श्रीहरींना पंचामृत फुलं ऋतुमानानुसार फळ अर्पण करावी, उपवास करावा. या दिवशी कपडे आणि अन्नदान करणं सुद्धा शुभ मानले जात. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर हा उपाय नक्की करा. आता उजव्या हातात पाणी आणि पिवळ फुल घ्या आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुमच्या कामात यश मिळावं यासाठी प्रार्थना करा. गायीच्या तुपाचा दिवा लावून नारायण कवच चा पाठ करा.

सफल एकादशीच्या दिवसापासून अखंड अकरा दिवस नारायण कवच पठण करावे. नोकरीतील अडचणी, संपत्तीतील काही अडचणी असतील तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. सगळ्या अडचणी दूर होतील. जर पैश्यांशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या संदर्भातला सुद्धा एक उपाय आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता. एकादशीच्या दिवशी सकाळी पाण्यात लाल फुल टाकून सूर्य देवांना ते जल अर्पण करा आणि संध्याकाळी पूजा स्थळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुमचं काम लवकर व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे.

आपत्य प्राप्तीसाठी काय करायचंय तर चांदीच्या पात्रात भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृत घ्यायच आहे आणि ते त्यांना अर्पण करायचं आणि श्रीहरी विष्णूंना पंचामृत अर्पण करताना ओम नमो नारायणाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि पंचामृत प्रसाद म्हणून घ्या आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करा. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची कुठलीही अडचण असेल समस्या असेल कुठल्याही प्रकारची साधना तुम्ही या सफला एकादशीच्या दिवशी कराल तर त्याचं फळ तुम्हाला नक्की नक्की मिळेल आणि तुमची सेवा सफल परिणामी तुमचं काम सफल होईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular