Monday, May 20, 2024
Homeआध्यात्मिकसंपुर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा ही 1 वस्तू.. मनासारखं घडेल.!!

संपुर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा ही 1 वस्तू.. मनासारखं घडेल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की श्रावण महिना म्हणजे अत्यंत पवित्र असा महिना. या महिन्यात भोलेनाथांची मनोभावे उपासना केली जाते व व्रत केले जातात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा केली जाते. यामुळे भगवान भोलानाथ आपल्यावर प्रसन्न होतात.

आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. अशा पवित्र श्रावण महिन्यात आपण जे पण काही उपाय करतो जे काही प्रयोग करतो त्याच्या अनंत पटीने फळ आपल्याला भगवंताकडून लाभत असते. त्यामुळेच अशा श्रावण महिन्यात व्रत उपवास व अनेक ग्रंथाची पारायण सुद्धा केली जातात.

मित्रांनो अशा पवित्र श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवाऱ्यात महिनाभर एक वस्तू ठेवायची आहे. ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि ही वस्तू देवाऱ्यात ठेवल्यानंतर या वस्तूची संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला पूजा करायची आहे.

ज्याप्रमाणे आपण देवी देवतांची पूजा करतो त्याच प्रमाणे या वस्तूची ही आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. अगदी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूची देवऱ्यात ठेऊन पूजा करायची आहे ही वस्तू नेमकी कोणती आहे ते आपण पाहूया.

मित्रांनो या छोट्याशा उपायाने तुमच्या मनात आहे ते पूर्ण होईल आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आहे. महादेवाचा हा महिना आपल्या हिंदू बांधवांसाठी अत्यंत पवित्र असा हा महिना असतो. श्रावण सोमवारचे व्रत आपण मनोभावाने आणि विश्वासाने करतो आणि आपल्या बऱ्याच मनोकामना देखील पूर्ण होतात.तर मित्रांनो पूर्ण श्रावण महिना तुम्हाला तुमच्या घरात ही एक वस्तू ठेवायची आहे आणि तिची रोज विधिवत पूजा करायची आहे.

मित्रांनो श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूचे पूजन करायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला पूजेच्या दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे. घरात असलेली सुपारी वापरू शकता. आणि ही सुपारी आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी पासून आपल्या घरातील देवाऱ्यात पूजेसाठी ठेवायची आहे.

लक्षात असू द्या आपल्या घरातील एखादी जुनी सुपारी असेल जे आपण आधी पूजेसाठी वापरली असेल तर अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही तर नवीन सुपारी आपल्याला या उपायात घ्यायची आहे. तर तुम्हाला ती सुपारी आणून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ती सुपारी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे.

त्यानंतर संपूर्ण विधिवतपणे त्या सुपारीचे हळद, कुंकू, अक्षदा लावून पूजा करायची व दिवा, अगरबत्ती लावून त्यानंतर सम्पूर्ण श्रावण महिना त्या सुपारीचे पूजन करायचे आहे. आपले जे काही मागणे असेल ते मागणे मागायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही सेवा असेल ती करायची आहे.

मित्रांनो महादेवाचा मंत्र किंवा जप असेल तो करायचा. पण ती सुपारी महिनाभर देवघरातच राहू द्यायची. सकाळी पूजा करताना किंवा साफ सफाई करताना ती उचलावी आणि परत तिला तिच्या जागी ठेवावी. श्रावण महिना संपल्यावर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी त्या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करुन द्यायचे आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular