Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकसर्वपित्री अमावस्येला गाईला दान करा ही एक वस्तू.. तुमच्या धनसंपत्तीत प्रचंड वाढ...

सर्वपित्री अमावस्येला गाईला दान करा ही एक वस्तू.. तुमच्या धनसंपत्तीत प्रचंड वाढ होईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! काही कारणास्तव सर्वपित्री अमावस्येलाही श्राद्धविधी करू शकला नाही तर या दिवशी दान करून काही उपाय केल्याने आपल्या पूर्वजांना समाधान मिळते आणि ते तुमच्यावर प्रसन्न होतात. तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊया पितृ अमावस्येची वेळ आणि या दिवशी काय करावे व काय करु नये. पितृ पक्षातील अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या या वर्षी 25 सप्टेंबरला आहे. याला महालय किंवा सर्वपित्री दर्श अमावस्या असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी आपले पूर्वज देवलोकात परत जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे.

अशी समजूत आहे की, इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्धविधी करू शकला नाही तर या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. तसेच काही कारणास्तव सर्वपित्री अमावस्येलाही श्राद्धविधी करू शकला नाही तर या दिवशी दान करून काही उपाय केल्याने आपल्या पूर्वजांना समाधान मिळते आणि ते तुमच्यावर प्रसन्न होतात. तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊया पितृ अमावस्येची वेळ आणि या दिवशी काय करावे ते.

पितृ अमावस्या तिथी आणि वेळ – पंचांगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, यावेळी सर्वपित्री अमावस्या 25 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 11 मिनिटापासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 22 मिनिटापर्यंत राहील.

अमावस्येला दान करा – पितरांना अमावस्येचे देवता मानले जाते आणि या दिवशी पूर्वज आपल्या मुलांकडे येतात आणि त्यांच्यासाठी दान करण्याची आशा करतात. पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी सत्कर्म करा आणि गरजूंना, गोरगरिबांना दान करा. तुमची सत्कर्म पाहून आणि तुमचे दान पाहून पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी आणि समृद्ध होण्यासाठी भरभरून आशीर्वाद देतात.

पितृ अमावस्येला काय करावे – पितृ अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करून अन्नपाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना आगारी टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व तेथे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. पितृ अमावस्येला सकाळी सर्वप्रथम पितृ तर्पण करावे. गाईला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घाला. गाईला चारा दिल्याने पितरांनाही समाधान मिळते. पितृ अमावस्येला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा चारमुखी दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. देवलोक सोडताना हा दिवा पितरांचा मार्ग उजळून टाकतो, अशी श्रद्धा आहे.

पितृ अमावस्येला काय करू नये – पितृ अमावस्येच्या दिवशी दारात रिकाम्या हाताने येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला जाऊ देऊ नका, त्यांना काहितरी दान करा. पितृ अमावस्येच्या दिवशी मां’साहार करू नये. संपूर्ण पितृ पक्षात लोक मां’साहार खात नाहीत आणि पितृ अमावस्या सुरू होताच मां’साहार करायला सुरुवात करतात, असं अनेकदा पाहायला मिळतं. असे केल्याने पितृ तुमच्यावर प्रसन्न होत नाहीत.

पितृ अमावस्येला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. तसेही करू नका. या दिवशी पुरुषांनी दाढी सुद्धा करू नये. तसेच या दिवशी कोणत्याही वृद्ध, महिला आणि लहान मुलांना अपशब्द बोलू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular