Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकसवत घरात आणि मी दारात.. बाळ फेकायला गेलेली ही बाई पण शेवटी.?...

सवत घरात आणि मी दारात.. बाळ फेकायला गेलेली ही बाई पण शेवटी.? ही सत्य घटना पाहून थक्क व्हाल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज आम्ही तुम्हाला माननीय डॉक्टर अभिजीत दादा सोनवणे यांच्या आयुष्यातील एक सत्यप्रसंग त्यांच्या शब्दात सांगणार आहे. काय आजी आज काय त्रास मी गमतीने या आजीला विचारलं. मला काय नको, माझ्या पोराला दे नेहमीच औषध. खूप थकली आहे. माणसाला होणारे जवळपास सर्व आजार हिला आहे. पण कधीही आजपर्यंत एकाही आजारावर स्वतःसाठी हिने औषध घेतलं नाही.

कधी विचारलं तर म्हणायची मला काय नको, माझ्या पोराला दे. असे तर हिला दिसायचं कमी आलं होतं. तेव्हा मात्र माझ्या मागे लागून भांडून डोळ्यांचा ऑपरेशन करून घेतलं होतं. इतरांच्या आधी स्वतःचा नंबर आधी लावून घेतला होता. हट्टाने गोळ्या आणि ड्रॉप मागून घेतले होते. मी तिला म्हणायचो इतर औषध कधी मागत नाहीस आणि आता डोळ्याच्या ऑपरेशन साठी का मागे लागली, यावर गप्प राहायची. आज भिक्षेकरांची गर्दी कमी म्हणून तिची थट्टा करायची लहर आली, बोल की म्हातारे काय औषध देऊ.? मी मुद्दाम नेहमीसारखंच बोलून गेलो.

मला काय नको माझ्या पोरालाच काय असेल तर दे. मी म्हटलं तुझ्या पोराला मी दरवेळी न तपासता तू सांगते म्हणून औषध देतो. एखाद्या वेळी काही झालं तर? पुढच्या वेळी त्याला इथं आणलं तरच औषध देईल नाहीतर देणार नाही. हे पाहून म्हातारी आजी जरा हबकली म्हणाली खरं म्हणतोय का तू की थट्टा करतो माझी? तिच्या डोळ्यातली भीती स्पष्ट जाणवली. म्हटलं खरच म्हणतोय थट्टा नाही पुढच्या वेळी त्याला इथे आणल्याशिवाय मी औषध देणारच नाही.

असं नका करू साहेब. नेहमी अरे तुरे करून बोलणारी आज साहेब म्हणायला लागली, मला जरा गंमत वाटली. म्हटलं पोरगं मोठ आहे ना तुझं मागच्यावेळी 40 वय सांगितलं होतं. त्याला इथे यायला पाय नाहीत का? आईला भीक मागायला लावून घरात झोपतो, लाज वाटत नाही का. त्याला काहीतरी कामधंदा तरी करायला सांग मी बोलून गेलो. म्हातारी आजी, जवळपास 75 वर्षांची, अंगावर मास नाही, फक्त हाडं सुरकुतलेल्या कातड्याने झाकलेली, कंबर आणि गुडघे कामातून गेलेले, डोळे खोल गेलेले, नाही म्हणायला मी दिलेला चष्मा फक्त त्या डोळ्यांवर. माझ्या वाक्यांनी ती जरा दुखावली असावी.

इकडे तिकडे धरत कण्हत मी बसलो होतो तिथे कशी बशी आली शेजारी बसली आणि हळूच आवाजात म्हणाली डॉक्टर साहेब खर आहे, पण तो येऊ शकत नाही कारण तो पायानं जन्मल्यापासूनच अपंग आहे. मी भीक मागते त्याची लाज त्याला वाटते की नाही मला माहित नाही. कारण जन्मालापासून तो येडसर हाय आणि कामधंदा पण करू शकत नाही. कारण येड्या माणसांना कुणी काम देत नाही. आता दचकायची पाळी माझी होती. मी शरमलो.

आपल्याला माहीत नसताना आपण काहीतरी बोलून जातो पण समोरचा माणूस दुखावतो. मी गंमत केली ग मला तसं नव्हतं म्हणायचं. मी काहीतरी सारवा सारव केली. आजी मात्र दुखावली गेली मलाच वाईट वाटलं, पुन्हा म्हटलं माफ कर ग आजी मी सहज बोलून गेलो. ती कसं बस हसली आणि म्हणाली माफ करून साहेब तुमचा काय दोष. आहो फाटल्याने शिवायला गेले आणि दोरा संपून गेला असं झालंय. दोष कुणाला द्यायचा. म्हटलं हो ना होते असं. ती पुन्हा कण्हत कण्हत जागेवर जाऊन बसली शांतपणे, नऊ महिने व्हायच्या आधी तो जन्माला आला होता का मी तिच्याजवळ जाऊन सहज विचारलं. मला काय माहित बेफीकिरने ती बोलली.

मी गोंधळलो, म्हटलं काय आजी तुला माहित नाही? म्हणजे तितक्यात शांतपणे ती बोलली माझ्या पोटचं नाही ते सवतीचं हाय. मला कळलं नाही आणि मग नेहमीच्या सवयीने मी उकरत गेलो. तिला विचारत गेलो. लग्नानंतर बरेच वर्ष हिला मुल नव्हते म्हणून नवऱ्याने दुसरा घरोबा केला. सवत आली. बाहेर कोणाचा आसरा नाही. सवत म्हणायची घरातली सगळी काम कर दोन वेळचे जेवण आणि रात्री झोपायला जागा देते. ही घरातली सगळी काम करायची पडेल ते. आणि सवत सांगेल ते आणि सोबत सांगेल ते. खरं तर ही लग्नाची आणि सवत बिना लग्नाची.

पण बोलणार कोण, बोललं तर ऐकणार कोण आणि बोलून फायदा काय दोन वेळेस जेवण आणि रात्रीला मिळालेला निवारा यातच ती धन्यता मानायची. सवत आणि नवरा दोघेही मिळून खूप जास्त त्रास द्यायचे पण एके दिवशी पाळणा हल्ला आणि सवतीला मुलगा झाला. सहा महिन्याच बाळ असताना नवरा अपघातात गेला आणि पुढच्या सहा महिन्यातच सवत कुठल्या अपघाताने देवा घरी गेली. वाकड्या पायाच हे बाळ घरात एकटं रडत राहायचं आईविना. दोन दिवस हिनेदेखील त्याला रडू दिल. सवतीच पोर माझा काय संबंध मेला तर मरू दे.

सवत आणि नवरा मेला, मला घराबाहेर काढलं मग मी कुणाचं का करू. दोन दिवसांनी हिन ते पोर उचललं आणि निघाली कुठेतरी टाकायला. या वर्षभराच्या पोराला तिने टाकून देण्यासाठी उचललं तसं ते पोर आई समजून हिच्या छातीशी झोपायला लागलं. पहिल्यांदाच आई झाल्यासारखं तिला वाटायला लागलं. पोर फेकायला गेलेली ही बाई पोराला न फेकता येताना दूध घेऊन आली. तिच्याही नकळत आई होऊन गेली. तीस वर्ष झाली त्याला ती सांभाळते त्याच्या आजार बरे करण्यासाठी राहतं घर विकलं, एकुलता एक छप्पर गेलं, पोर मात्र तसंच राहिलं.

दुर्दैव हे आहे की या मुलाला काहीच कळत नाही आपल्यासाठी कोणी काय केलं हे समजण्याची त्याची पात्रता नाही. घरी गेलं की हा मुलगा या आजीकडे अनोळखी नजरेने पाहतो जशी की ही माझी कुणीच नाही आणि यास अनोखी मुलाला जगण्यासाठी ही सावत्र आई सख्खी होऊन जाते. रस्त्यावर भीत मागते आज कित्येक वर्ष त्याच दुःखन बघता यावं आणि त्यावर उपाय करता यावा केवळ यासाठी तिने डोळ्यांचा ऑपरेशन करून घेतलं होतं. कोणीतरी तकोणासाठी काहीतरी करत असतं त्यामागची भावना ही असते की उद्या याची परतफेड होणारच आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular