स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो शनिवारच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जसे की शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो. पौराणिक कथांच्या अनुसार शनिदेव हे भगवान सूर्यदेव यांचे सुपुत्र आहेत. ब्रह्मा यांच्या आशीर्वादाच्या प्रभावाने त्यांचा प्रभाव आपल्या पिता सूर्यदेव पेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.
प्रत्येक मनुष्याच्या राशीमध्ये सूर्य एक महिना एक दिवस तर चंद्र दोन महिने दोन दिवस तसेच मंगळ दीड महिना, बुध एक महिना व शुक्र एक महिन्यांपर्यंत राहतात. परंतु फक्त शानिदेव एकमेव असे आहेत जे कोणत्याही राशीमध्ये अडीच वर्ष ते साडेसात वर्षे ठाण मांडून राहत असतात.
जातकांच्या कुंडलीमध्ये शनीदेव येण्याच्या तीन महिने आधीपासूनच आपला प्रभाव दाखवणे सुरू होत असते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या राशीत शनिदेव तीन ते चार वेळेस येऊन बसतात. प्रत्येक मनुष्यावर शनिदेवांचा प्रभाव हा त्यांच्या ग्रहांच्या अनुकूलते नुसार पडतो. म्हणून आपण शनिदेवांच्या वक्र दृष्टी पासून वाचायला पाहिजे.
तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही खास चुका ज्या तुम्ही शनिवारच्या दिवशी कटाक्षाने टाळल्या हव्यात. यामुळे भगवान शनिदेव क्रोधित होत असतात. म्हणून आता मनापासून शनिदेवांचे स्मरण करून आम्ही तुम्हाला ही महत्वाची माहिती देत आहोत. ती व्यवस्थित समजून घ्या.
आपल्यापैकी अनेक जण शनिवारच्या दिवशी शनिदेवांचे दर्शन घेण्यासाठी शनिदेवांच्या मंदिरात जात असतात. तर तुम्ही दर्शन घेत असतांना कधीही शनीदेवांच्या डोळ्यात बघायचं नाहीये. असं केलं तर तुमच्यावर शनिदेवांची वाईट नजर पडू शकते. शनिदेवांच्या पायाकडे बघितल्याने व्यक्तीवर शनिदेवांची कृपा दृष्टी आणि चांगला आशीर्वाद लाभत असतो.
ज्यामुळे ती व्यक्ती मालामाल होते. शनिवारच्या दिवशी पती-पत्नीस दूर राहिले पाहिजे. या दिवशी संबंध बनवले नाही पाहिजे अन्यथा शनि देव नाराज होऊ शकतात. शनिवारच्या दिवशी लोखंड अथवा लोखंडाच्या वस्तू सामान गाडी अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची खरेदी करू नका.
वस्तू कितीही छोटी असू दे अथवा मोठी परंतु लोखंडाची वस्तू शनिवारी अजिबात खरेदी करू नका. राजा विक्रमादित्य याने शनिदेवांना लोखंडाचे आसन दिले होते. ज्यावर रागात येऊन शनिदेव यांनी वक्रदृष्टी टाकली होती.
तेव्हापासून शनिवारी लोखंड खरेदी करणे किंवा विकणे अशुभ मानले जाते. याउलट शनिवारी लोखंडाचे दान शनिदेवांना प्रसन्न करू शकते. याचे तुम्हाला शुभ फळ मिळू शकते. शनिवारी चामडे अथवा चामड्याची कोणतीही वस्तू जसे चप्पल, बूट, पर्स, बेल्ट इत्यादी खरेदी नाही केले पाहिजे.
अशा वस्तू शनिवारी खरेदी केल्यामुळे तुम्हाला सफलता प्राप्त होण्यामध्ये अनेक अडथळे येतात. शनिवारी शनी मंदिरात जात असाल तर घरी परतताना मागे वळून पाहू नका. यामुळे शनी दोष लागतो. शनी देवांची आराधना करताना आपल्या घरी प्रस्थान करा. यामुळे शनि दोष नष्ट होतो.
शनिवारी कोणत्याही प्रकारचे तेल घरी आणू नका. शनिवारी तेल आणल्याने घरी दुःख कष्ट आणि रोग येतात. या उलट शनिवारी शनी देवांवर तेल चढवल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवांना शांत करण्यासाठी घराबाहेर जाते वेळेस आरशामध्ये तुमचा चेहरा बघून जा. यामुळे सर्व काम आश्चर्यकारकरित्या पूर्ण होतील.
शनिवारी घरी कोळसा आणणे वर्जित मानले जाते. कोळसा काळ्या रंगाचा असतो. ज्याला घरी आणण्याचा अर्थ म्हणजे शनी देवाच्या स्वरूपाला घरी आणणे. हे इंधन आहे. शनिवारी कोणत्याही प्रकारचे इंधन घरी आणल्याने वाईट काळ सुरू होतो.
जुन्या झाडू ला घरातून शनिवारच्या दिवशी बाहेर काढल्याने अत्यंत चांगला परिणाम मिळतो. शनिवारच्या दिवशी तुटलेला फुटलेल्या वस्तु घरातून बाहेर काढणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिवारी काळया रंगाची चप्पल अथवा काळा कपडा दान करा.
शनिवारच्या दिवशी काळे तीळ खरेदी करणे देखील वर्जित आहे. शनीदेवांच्या दशेमध्ये काळ्या तिळाच्या दानाला विशेष महत्त्व आहे. याचबरोबर शनिवारी मीठ देखील खरेदी करू नये यामुळे आपल्या घरामध्ये आजार येण्याची शक्यता असते. शनिवारच्या दिवशी तेलामध्ये आपला चेहरा बघून दान केल्याने आपला शनिदोष न’ष्ट होतो.
मित्रांनो शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. नकळत येऊन सावकाश जाणे हीच तर शनीदेवांची खासियत आहे. त्यामुळे असे कोणतीही चुकीचे काम करू नका जेणेकरून शनिदेव तुमच्यावर नाराज होतील. म्हणून कोणतंही कर्म करताना जरा जपूनच शनिदेव तुमचे सर्वांचे कल्याण करोत…!! शुभं भवतु.!!
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!