Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकश्राद्ध पक्षात हे 7 संकेत जर तुम्हाला दिसले तर समजून घ्या की...

श्राद्ध पक्षात हे 7 संकेत जर तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचे वाईट दिवस आता संपलेत.. पितृंच्या आशीर्वादांचा पाऊस पडणार.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! काही दिवसांपूर्वीच पितरांना समर्पित श्राद्ध पक्ष सुरू झाला आहे. पितृ पक्षात कावळा हे पितरांचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत येथे जाणून घेऊया कावळ्यांशी संबंधित काही शुभ चिन्हे, जी पूर्वजांच्या आशीर्वादाने तुम्हाला धन-समृद्धीचे संकेत देतात.

हा श्राद्ध पक्ष 10 सप्टेंबरपासून श्राद्ध पक्ष सुरू झाला आहे. श्राद्ध पक्षाला पितृ पक्ष असेही म्हणतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत हे दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहेत. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात.

पितृपक्षात कावळ्याचे महत्त्व खुपचं वाढते. कारण आपल्या हिंदू संस्कृतीत कावळे हे पूर्वजांचे प्रतीक मानले जातात आणि या काळात त्यांना घास देण्याची परंपरा आहे. या दरम्यान कावळ्याने तुम्ही अर्पण केलेला घास चाखला तर तो थेट पितरांना मिळतो, असा समज आहे. हेच पितरांच्या सुखाचे आणि समाधानाचे लक्षण मानले जाते. याशिवाय पितृ पक्षादरम्यान असे काही संकेत आहेत, जे खूप शुभ मानले जातात. या संकेतांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

पितृ पक्षात मिळतील शुभ संकेत श्राद्ध पक्षात जर कावळा चोचीत कोरडा पेंढा (चारा) घेऊन जाताना दिसला तर हा प्रचंड धनप्राप्तीचा संकेत मानला जातो.

जर घराच्या छतावर किंवा हिरव्यागार झाडावर कावळा बसलेला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरावर पितरांचा आशीर्वाद कायम आहे आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी कायम नांदत राहणार.

पितृपक्षात तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचीत फुले व पाने धरुन ठेवल्याचे दिसले तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत. अशा वेळी तुम्ही त्यांच्याकडून जे जे काही मागाल ते ते सर्व तुम्हाला मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

जर कावळा गाईच्या पाठीवर बसून चोच रगडतांना दिसला तर ते घरात सुख आणि उत्तम अन्न लाभण्याचे संकेत आहेत. तसेच, डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसला, तर ते भरपूर पैसा मिळण्याचे संकेत आहेत.

जर कावळा धुळीत लोळताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की तिथे राहणाऱ्या लोकांच्या घरी लवकरच पैशांचे, माता लक्ष्मींचे आगमन होईल आणि जर कावळा धान्याच्या ढिगाऱ्यावर बसलेला दिसला तर ते सुद्धा समृद्धीचे प्रतीक आहे.

जर कधी कावळा गवत घेऊन उडत असताना दिसला आणि विहिरीच्या काठावर किंवा नदीच्या काठावर बसला, तर याचा अर्थ असा होतो की तुमची एखादी मौल्यवान वस्तू जी हरवली आहे. ती तुम्हाला परत मिळणार. याशिवाय कोर्ट च्या एखाद्या केसमध्ये विजय मिळण्याचा आणि संपत्तीमध्ये लक्षणिय वाढ होण्याचेही हे संकेत आहेत.

डावीकडून कावळ्याने येऊन अन्न ग्रहण केलं तर तुमचा प्रवास कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर मागच्या बाजूने एखादा कावळा उडत आला तर प्रवासादरम्यान धनलाभ होण्याचे ते संकेत आहेत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular