स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्र-मैत्रिणींनो श्रावण महिन्यामध्ये देवघरात दररोज ठेवा हा नेवेद्य या सेवेने स्वामीमहाराज तसेच महादेव देखील प्रसन्न होतील. श्रावण महिना सुरु झाला आहे ज्यावेळी सकाळी आपण देवपूजा करतो. सात साडेसात च्या वेळी किंवा त्याच्या आधी देखील लवकर देवपूजा काहीजण करत असतात.
ही पूजा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा नेवेद्य देवघरामध्ये ठेवायचा आहे. प्रत्येक वेळी आपण आपला स्वयंपाक होतो त्या वेळी देवाजवळ नैवेद्य ठेवतो म्हणजे दुपारी संध्याकाळी अशा पद्धतीने मात्र आपल्याला पूजा झाल्यानंतर लगेचच ठेवायचा आहे. ज्यांची देवपूजा पाहते होते. त्यांनी हा नेवेद्य पहाटे ठेवावा त्यांनी ठेवावा. व ज्यांची सकाळी होते त्यांनी हा नैवेद्य सकाळी ठेवा. म्हणजे ज्यावेळी आपण पूजा करतो, त्यावेळी लगेच आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे.
मित्रांनो आपण जो पूजा झाल्यानंतर नैवेद्य ठेवणार आहोत. हा नेवेद्य स्वामी समर्थ महाराजांना व महादेवांना खूप आवडीचा नेवेद्य आहे. त्यांना नैवेद्य दाखवताना आपल्याला आपल्या घरामध्ये एका वाटीमध्ये दूध घ्यायचे आहे. यामध्ये थोडी साखर घालायची आहे. व त्यामध्ये एक तुळशीचे पान घालावे. व त्याचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना महादेवांना दाखवावा.
सोबत पिण्यासाठी ग्लासमध्ये पाणी देखील ठेवावे. मग हे दूध तापवलेले असू दे किंवा नसू दे आपल्या घरामध्ये जसे जे काही दूध शिल्लक आहे, त्यांचा चा नैवेद्य आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना व महादेवांना दाखवायचा आहे. हा नैवेद्य श्रावण महिन्या पुरताच न ठेवता, प्रत्येक दिवशी कोणताही महिना येऊ दे त्यादिवशी हे दूध आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे असते.
अशाप्रकारे तुम्ही जर देवघरामध्ये ठेवत नसाल तर किमान श्रावण महिन्यात तरी अशाप्रकारे स्वामींना व महादेवांना नैवेद्य पूजा झाल्यानंतर सकाळी दाखवा. त्यानंतर मित्रांनो दुपारचा नैवेद्य दाखवला नाही तरी चालतो सकाळी आपण दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. तो नेवेद्य तेथून घेऊन आपल्या घरातील सर्वांनीच असतो प्रसाद म्हणून थोडा थोडा घ्यायचा आहे.
तसेच नेवेद्य दाखविताना जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी देखील सर्वांनी थोडे थोडे द्यायचे आहे किंवा आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये ते मिक्स करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये रोज हा नैवेद्य ठेवायचा आहे. आपल्या या सेवेने स्वामी महाराज व महादेव नक्की प्रसन्न होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!