Monday, December 11, 2023
Homeइतिहासश्रावण सोमवार सात महाउपाय.. जे करताच मिळेल पुण्यफल.!!

श्रावण सोमवार सात महाउपाय.. जे करताच मिळेल पुण्यफल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. हा एक पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यापासूनच सगळ्या सणांना सुरुवात होते. एकापाठोपाठ एक असे सन चालू राहतात. मित्रांनो श्रावण महिन्यात बरेच जण तीर्थक्षेत्रे जाऊन देवी देवतांचे दर्शन घेतात.

श्रावण महिना हा देवाधिदेव महादेव यांना समर्पित केलेला आहे. या श्रावण महिन्यात लोक अनेक नद्यांवरती जाऊन गंगास्नानाचा अनुभव घेतात. तसेच अनेक अभिषेक देखील करतात. त्यामुळे ज्या काही अडचणी संकटे तसेच धनसंपत्ती बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण असेल त्या सर्व दूर होतात. बरेच लोक अनेक उपाय या श्रावण महिन्यात करीत असतात.

मित्रांनो अनेकांना वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या अडचणींना तसेच संकटांना सामोरे जावे लागते. तर अशा लोकांनी श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत अवश्य करावे. तसेच अनेकांना विवाह न जमणे म्हणजेच विवाह जुळण्यात अनेक अडचणी बाधा येत असतील तर अशा व्यक्तींनी संकल्प करून सोमवारचे व्रत अवश्य करावे. बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये आरोग्याच्या बाबतीत विविध समस्या असतात.

तर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये शांतता हवी असेल तसेच आरोग्याच्या बाबतीत सर्व समस्या दूर व्हाव्यात असे जर वाटत असेल तर श्रावणी सोमवारचे व्रत आवर्जून करावे. यामुळे या सर्व आरोग्याच्या बाबतीतील समस्या दूर होऊन आपले जीवन हे आनंदीमय बनते. श्रावणी सोमवारचा संकल्प तुम्ही श्रावण महिन्यात करू शकता. या व्रतामध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते. महादेवाच्या पिंडीवर पाणी व बेलपत्र अर्पण केले जाते.

श्रावणी सोमवारचे व्रत हे सकाळी लवकर उठून स्नान करून अनवाणी पायी चालत महादेवांच्या मंदिरात जावे. जाताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जावे. हे पाणी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. तसेच पिंडीवर बेलपत्र देखील अर्पण करून महादेवांना साष्टांग दंडवत घालायचे आहे.

महादेवांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करून आपणाला घरी परतायचे आहे. दिवसभर उपवास करावे म्हणजे फक्त फलाहार करावा. संध्याकाळी परत महादेवांचा 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. संध्याकाळी शिवशंभूंची आरती करून आपला उपवास सोडावा. अशाप्रकारे तुम्ही श्रावणी सोमवारचे व्रत करू शकता.

मित्रांनो श्रावण महिन्यात काही खास उपाय जर आपण केले तर त्याचा परिणाम आपल्याला लगेचच पाहायला मिळतो. तर श्रावण महिन्यात असे काही खास उपाय जे लगेचच आपल्या जीवनात चांगले फळ प्राप्त करून देतील असे काही उपाय पाहूयात.

मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण शंकरांची पूजा अगदी मनोभावे करीत असतो. या पूजेच्या साहित्यामध्ये विविध वस्तू आपण वापरत असतो. त्यापैकी अक्षता ही एक महत्त्वाची वस्तू आहे. मित्रांनो अक्षता या पूजनेमध्ये वापरल्या तर आपले जे काही कर्ज असेल ते कर्ज लवकरात लवकर फिटते. परंतु या अक्षता म्हणजे तांदूळ तुटलेले नसावेत. ते अखंड असावेत. जर तुटलेले तांदूळ असतील तर आपली पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे देखील जावे लागते. त्यामुळे कधीही शंकरांच्या पूजनेमध्ये अखंड तांदूळ असावेत. जर तुम्ही शंकरांना भात अर्पण केला तर ज्या व्यक्तींना विवाह जुळण्यात काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होऊन हे विवाह जुळतील.

मित्रांनो, तुम्ही जर महादेवांना मध अर्पण केला तर ज्या जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांची ही इच्छा पूर्ण होते. या जोडप्यानी दोघांनी मिळून मध महादेवांना अर्पण करायचा आहे. त्यामुळे त्यांचीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते. मित्रांनो महादेवांना जर गहू अर्पण केला तर पती पत्नी मध्ये असणारे भांडण तंटे, वाद-विवाद दूर होऊन प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. तसेच घरामध्ये धनसंपत्तीत देखील वाढ होईल व घरात एक प्रकारची शांतता निर्माण होईल.

जर तुमच्या घरामध्ये आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असतील म्हणजे एखादी व्यक्ती खूप काळापासून आजारी असेल तर अशा व्यक्तींनी महादेवांना दूध व पाणी दोन्ही मिक्स करून अर्पण करायचे आहे. हे दूध व पाणी याचे मिश्रण अर्पण करीत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व आरोग्याच्या बाबतीत समस्या दूर होऊन तुमचे घर हे निरोगी राहील.

जर तुम्ही महादेवांना केशर अर्पण केले तर तुम्हाला समाजामध्ये मानसन्मान तसेच प्रतिष्ठा मिळेल. तुमची आर्थिक बाबतीतील सर्व समस्या दूर होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यामुळे जर तुमची आर्थिक स्थिती सुधारावी असे वाटत असेल तर महादेवांना केशर नक्की अर्पण करावे.

जर तुम्ही महादेवांना उसाचा रस, गूळ किंवा साखर अर्पण केलात तर यामुळे तुमचे दरिद्रता दूर होऊन सौभाग्यशाली रहाल. तुमचे जीवन बदलून तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती मिळेल. जर तुम्ही महादेवांना दही अर्पण केले तर तुम्ही कोणताही निर्णय अगदी शांततेत घेऊन धैर्यवान बनाल. गंभीर न राहता येणाऱ्या सर्व संकटांचा अगदी धैर्याने सामना कराल.

मित्रांनो जर तुम्ही महादेवांना चंदन अर्पण केले तर तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. तुमचा मान सन्मान वाढेल तुम्ही चारचौघांमध्ये आकर्षक वाटाल. जर तुम्ही महादेवांना मध अर्पण केले तर तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचे माधुर्य येईल. जर इतर लोकांना तुमचे बोलणे कडवट वाटत असेल तर तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या वाणीमध्ये मधुरपणा जाणवायला लागेल. त्यामुळे इतर लोक देखील तुमचे कौतुकच करतील.

जर तुम्ही महादेवांना बेल अर्पण केले तर तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील व तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तुमचे जीवन हे आनंदीमय बनेल. ज्या काही अडचणी, पीडा, बाधा आहे त्या सर्व दूर होतील.

महादेवांना पांढऱ्या रंगाच्या जर वस्तू अर्पण केल्या तर आपले स्वास्थ्य व्यवस्थित राहते म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत सर्व समस्या दूर होतील. तुम्ही महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र देखील अर्पण करू शकता. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मनोकामना किंवा इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर तुम्हाला विड्याचे एक पान घेऊन त्यावरती दोन लवंगा ठेवून, एक विलायची व लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक धागा, एक सुपारी ठेवून हे पान तुम्हाला महादेवांना समर्पित करायचे आहे. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना इच्छा भगवान शंकर नक्की पूर्ण करतील.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणताही उपाय जरी केला परंतु तो उपाय करीत असताना कोणत्याही प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ नये. अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्ही हे उपाय करायचे आहेत. कारण देवतांना तुम्ही अगदी मनोभावे व श्रद्धेने केलेली पूजा किंवा एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केले तर ते अगदी आनंदाने स्वीकारतात. ते फक्त भक्तांच्या मनातील भाव पाहत असतात. त्यामुळे अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्ही हे उपाय नक्की करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular