Saturday, May 25, 2024
Homeआध्यात्मिकश्रावणात हे 13 संकेत मिळाले तर समजून जा प्रत्यक्ष महादेव आपल्या घरात...

श्रावणात हे 13 संकेत मिळाले तर समजून जा प्रत्यक्ष महादेव आपल्या घरात विराजमान आहेत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. भगवान शिवशंभूंचा सर्वात प्रिय महिना म्हणजे श्रावण मास या श्रावण मासात प्रत्येक जण देवाधिदेव महादेवांची मनोभावे उपासना करत असतो. शिवालयात जाऊन शिवलिंगाची पूजा करत असतो तसेच ओम नमः शिवाय सारख्या महामंत्राचा जप करत असतो जेणेकरून महादेव प्रसन्न होतील, आणि आपल्या मनातील इच्छांची मनोकामनांची पूर्तता करतील. आपल्या जिवनातील दुःख क’ष्ट हरण करतील.

या श्रावण महिन्यामध्ये जर कधी हे 13 संकेत आपल्यास मिळालेत. या 13 संकेतांची चाहूल जर आपणास मिळाली तर समजून जा की आपण केलेली पूजा देवाधि देव महादेवांनी मान्य केलेली आहे. आणि महादेवांची असीम कृपा आता आपल्याला प्राप्त होणार आहे. तर हे तेरा संकेत कोणते असतात..?

तर यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे तुम्ही घराबाहेर पडताच गोमातेचे म्हणजेच गाईचे दर्शन होणे. घराबाहेर पडताच जर तुम्हाला एखादी गोमाता दिसली, गाय दिसली तर लक्षात घ्या हिंदू धर्मशास्त्रानुसार गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. भगवान भोलेनाथ महादेव सुद्धा गोमातेमध्ये वास करतात. आणि म्हणूनच प्रत्यक्ष भगवान महादेवांनी आपणास दर्शन दिलेलं आहे.

हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की भगवान महादेवांनी आपल्या पूजेचा स्वीकार केलेला आहे. या सारखाच दुसरा संकेत तो म्हणजे घराबाहेर पडताच नंदी देवांच म्हणजेच बैलाच दर्शन होणे.. नंदी देव हे भगवान शिव शंकरांचे एक प्रमुख गण आहेत आणि त्यांच्या दर्शनाने सुद्धा हा संकेत प्राप्त होतो की शिवशंभुंनी आपली पूजा स्वीकारलेली आहे‌.

स्वप्नामध्ये किंवा साक्षात नागदेवतेचे दर्शन होणे सापाचे दर्शन होणे हा सुद्धा एक मोठा संकेत आहे. कारण नागदेवता शिवशंकरांच्या गळ्यामध्ये आभूषण स्वरूप आहेत शिवशंभुंनी त्यांना गळ्यामध्ये धारण केलेलं आहे. विशेष करून सोनेरी सफेद काळ्या किंवा करड्या रंगाच्या सापाचे दर्शन नागाचे दर्शन हे श्रावण महिन्यात अतिशय शुभ मानण्यात आलेला आहे. भगवान शिव शंकरांच्या हातात जे शस्त्र सदैव असत ते म्हणजे त्रिशूल हे शिवशंभूंचं अतिशय प्रिय शस्त्र आहे.

जर या त्रिशूलाचे दर्शन स्वप्नामध्ये असेल किंवा साक्षात असेल तुम्हाला या श्रावण महिन्यात होत असेल तर हा सुद्धा मोठा संकेत आहे.. की शिवशंकरांच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख कष्ट आणि संकटे लवकरच निघून जाणार आहेत. श्रावण महिन्यात रुद्राक्षाचे दर्शन सुद्धा प्रत्यक्ष शिवदर्शन इतकच हिंदू धर्मशास्त्रांनी महत्त्वपूर्ण मानलेल आहे रुद्राक्षाचे दिसणं म्हणजे प्रत्यक्ष शिवशंभुंनी तुम्हाला दर्शन दिल्यासारखंच आहे.

याचा अर्थ हा संकेत असं सांगतो की आपल्या मनातील इच्छांची पूर्तता मनोकामनांची पूर्तता शीघ्र लवकरात लवकर होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना रिकाम्या हाती कधीच परत पाठवू नका. आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे सामर्थ्याप्रमाणे त्यांना आपण दानधर्म नक्की करा कारण हा सुद्धा एक फार मोठा संकेत आहे की जटाधारी साधुसंतऋषिमुनी आपल्या द्वारी आल्यास हा प्रत्यक्ष शिवशंभुंनी आपली पूजा स्वीकार केल्याचा संकेत आहे.

स्वप्नामध्ये माता पार्वतीने दर्शन दिल्यास जे विवाहइच्छुक मुल-मुली आहेत. आपल्या द्वारी आपल्या दरवाजामध्ये आपल्या दारापुढे जर एखादी विद्वान धार्मिक व्यक्ती येत असेल एखादे साधू संत ऋषिमुनी येत असतील तर त्यांना रिकाम्या हाती कधीच परत पाठवू नका. आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे सामर्थ्याप्रमाणे त्यांना आपण दानधर्म नक्की करा. कारण हा सुद्धा एक फार मोठा संकेत आहे की जटाधारी साधुसंतऋषिमुनी आपल्या द्वारी आल्यास हा प्रत्यक्ष शिवशंभुंनी आपली पूजा स्वीकार केल्याचा संकेत आहे.

स्वप्नामध्ये माता पार्वतीने दर्शन दिल्यास जे विवाहइच्छुक मुल-मुली आहेत त्यांचे विवाहाचे योग लवकरात लवकर जुळून येतात स्वप्नामध्ये शिवमंदिराचे दर्शन होणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे‌ शिवकृपा प्राप्त होण्याचा भगवान शिवशंकर जर आपल्या स्वप्नामध्ये तांडव नृत्य करताना आपण पाहिले भगवान शिव शंकर तांडव नृत्य करताना जर आपणास स्वप्न पडलं तर लवकरच आपले शत्रू शांत होतात आणि आपले अडकलेले पैसे सुद्धा लवकरच परत प्राप्त होतात. श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात दूध किंवा दही दिसणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे.

की भगवान शिव शंकरांची अपार कृपा लवकरच आपणास प्राप्त होणार आहे भांग किंवा भस्म यांचं साक्षात झालेलं दर्शन अचानक झालेलं दर्शन हा सुद्धा संकेत आहे की भगवान शिव शंकरांनी साक्षात आपणास दर्शन दिलेल आहे आणि आपली पूजा त्यांनी मान्य केलेली आहे तर श्रावण महिन्यामध्ये या 13 पैकी एक जरी संकेत आपणास दिसला तर शिवशंभूंची कृपा आपल्यावर नक्की झालेली आहे. त्यांनी आपली पूजा स्वीकार केलेली आहे हे समजून जा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular