Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकश्री कृष्ण सांगतात मृ'त्यूच्या एक तास आधी तुम्हाला मिळतात हे 5 संकेत.....

श्री कृष्ण सांगतात मृ’त्यूच्या एक तास आधी तुम्हाला मिळतात हे 5 संकेत.. गरुडपुराण.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या गीतेमध्ये सांगितले आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृ’त्यू अवश्य होतोच. परंतु मनुष्य मोह बंधनात अडकल्यामुळे आपल्या मृ’त्यूला नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो. पण मृ’त्यू अटळ आहे हे त्याला त्यावेळी कळत नाही आणि जेव्हा मृ’त्यू होणार असतो त्यावेळी त्याला स्वतःहून मृ’त्यू जवळ आला आहे असे समजते. मृ’त्यूच्या काही वेळ आधी मनुष्याला जाणवते की येणाऱ्या काही वेळातच त्याचा मृ’त्यू होणार आहे. मृ’त्यू येण्याच्या आधी असे काही संकेत दिसू लागतात ज्यामुळे त्या व्यक्तीला कळून जाते की मात्र एका तासा मध्येच आपला मृ’त्यू होणार आहे.

कोण आपल्याला कधी कायमचं सोडून जाईल हे सांगता येत नाही. आता तर अगदी कमी वयात देखील मृ’त्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे लोकांना मृ’त्यूची भीती वाटायला लागली आहे. मृ’त्यूच्या वेळी कसे वाटते किंवा मृ’त्यूपूर्वी चिन्हे कशी दिली जातात हे जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता असते. धार्मिक ग्रंथांमध्ये मृ’त्यूबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. यामध्ये मृ’त्यू, त्यानंतरचा आत्म्याचा प्रवास आणि पुनर्जन्म यांच्याबद्दल बरंच काही सांगण्यात आलं आहे. गरुड पुराणात सांगितले आहे की मृ’त्यूपूर्वी माणसाच्या शरीरामध्ये कोणते बदल होतात आणि त्याला कसे वाटते.

भगवान श्रीकृष्ण यांनी असे पाच संकेत सांगितले आहेत ज्यामुळे मनुष्य आपल्या मृ’त्यू बद्दल माहिती करून घेऊ शकतो. भगवान श्रीकृष्णाच्या अनुसरे या संकेताच्या माध्यमातून मनुष्य आपल्या मृ’त्यूची वेळ माहीत करून आपले कुटुंबीय आणि मित्र गणांसोबत अशा गोष्टी बोलू शकतो, ज्या फक्त मृ’त्यू समीप येता केल्या जातात. चला तर मग फार वेळ न घालवता ते पाच संकेत कोणते आहेत जाणून घेऊयात.

भगवान श्रीकृष्ण यांच्या मते ज्या मनुष्याचा मृ’त्यू होणार आहे, त्या व्यक्तीस सुमारे एक तास आधी आपल्या संपूर्ण जीवनात केलेले सर्व छोटे मोठे कर्म दिसू लागतात. जीवनात केलेले पाप पुण्य तसेच आपले आत्ता आणि नजीकच्या लोकांसोबत घालवलेला वेळ दिसू लागतो. यामुळे माणूस ध्यान योगाच्या अवस्थेत पोहोचतो. ज्यामध्ये त्याला फक्त आणि फक्त कर्मच दिसू लागतात. त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही.

स्वप्नामध्ये स्वर्ग तसेच नरकाचे दरवाजे दिसणे..
अशा प्रकारची स्वप्न माणसाला मृ’त्यूच्या एक दिवस आधीच दिसू लागतात. व्यक्तीस स्वप्नामध्ये स्वर्ग आणि नरक यांचा दरवाजा आळीपाळीने दिसू लागतो. व मनुष्य त्या दरवाजाच्या बाहेर वाट बघत उभा असतो. आत मध्ये काय चालू आहे ते अजिबात दिसत नाही मात्र फक्त बाहेरचे मोठे दरवाजेच दिसतात.

यमदेवांचे दूत दिसणे.. श्रीकृष्ण यांच्या मते ज्या व्यक्तीचा मृ’त्यूच्या शिक्षेस मात्र एक प्रहर राहिला आहे त्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूस यमराजाचे दूत असल्याचे जाणवते. मृत्युपूर्वी फक्त 21 सेकंद आधी यमराजाचे दूत स्पष्टपणे दिसतात. अनेकदा या दूतांना पाहून मरणारी व्यक्ती रडू लागते. परंतु त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना याचे कारण समजत नाही.

आपले पूर्वज स्वप्नामध्ये दिसणे.. गरुडपुराणानुसार मृ’त्यू होण्याचा सगळ्यात मोठा संकेत आहे, काही दिवस आधी त्या व्यक्तीचे पूर्वज त्याला स्वप्नात दिसू लागतात. बऱ्याचदा अनेक लोक याला पितृदोष समजण्याची चूक करतात. परंतु पूर्वजांचे अनेकदा वारंवार स्वप्नात येणे मृ’त्यूचा एक संकेत आहे.

श्रीकृष्ण सांगतात की ज्या व्यक्तीला स्वप्नामध्ये घुबड आणि जळणारी लाकडे दिसतात त्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ निकट आलेली असते. अशा व्यक्तीचा मृ’त्यू 21 ते 91 दिवसांमध्ये होतो. अशा व्यक्तींना आपला राहिलेला वेळ आपल्या आप्त लोकांसोबत व्यतीत केला पाहिजे. आयुष्यभर केलेल्या चुकांना सुधारले पाहिजे. स्वप्नात जळणारी लाकडं त्याची अर्थी दर्शवतात तर घुबड त्याचा काळ दर्शवतो की तो जवळच आहे. असे पाच संकेत दिसू लागल्यास समजून जा मृत्यू निकट आहे. श्रीकृष्ण सांगतात की राहिलेला वेळ अशा व्यक्तींनी केलेल्या चुका सुधारून सत्कर्म करण्यात आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत घालवावा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular