स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो आपल्याला जर थोडेसे यश मिळाले तर आपण भुरुळून जातो. जे आपल्या पेक्षा मागे आहेत त्यांना कमी समजतो. त्यांची चेष्टा करतो, थोड्या यशाने आपण हवेत उडायला लागतो.
प्रगती खूप करावी, यशाची उंच शिखरे गाठावी, आभाळाला स्पर्श करावा परंतु आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवावे. आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळाले. तर ही आपली पूर्वस्थिती विसरू नये. आपण जमिनी पासूनच वर आलेलो आहोत याचे नेहमी भान ठेवावे.
कोणाचे बरे-वाईट आर्थिक स्थिती, रंगरूप, शारीरिक अथवा राहणीमानाची, त्यांच्या खाण्यापिण्याची, गरिबीची, मुलाबाळांची अथवा ते वापरत असलेल्या साध्यासुध्या कपड्यांची चुकूनही चेष्टा करू नये.
प्रत्येकजण आपल्या पूर्व जन्माच्या पाप-पुण्य प्रारभानुसार बरे-वाईट जीवन जगत असतो. आपल्याहून हुशार, दिसायला देखणे, बुद्धिमान, श्रीमंत, नीतिमान, कर्तव्यतत्पर तसेच सुख-समृद्धी अनेकजण लोळत असलेले अनेक जण असू शकतात.
तर त्याच्या उलट अनेक प्रकारे दुखी जीवन ही अनेकांच्या वाट्याला आलेले असते. पूर्व कर्मानुसार ते आपले जीवन जगत असतात. अंधारा मागून दिवस व दिवसानंतर रात्र हा निसर्गाचा नियम आहे. त्याचे उल्लंघन करू नका.
कर्मगती देवांसह कोणालाही चुकलेली नाही. एखाद्या खेळात, अथवा कलेत संगीतात प्राविण्य मिळाले. एकदा पुरस्कार, अथवा सर्टीफिकीट मिळाले. चार लोकात वहा वहा सुरू झाली.
नोकरीत योग्यता नसताना वरची पोस्ट मिळाली. की अनेक जण हवेत तरंगू लागतात. आज जे गर्व करतात, उन्मत्त पणाने, अथवा गुर्मिने वागतात, कृतज्ञतेची जाण ठेवत नाही.
त्यांनी आपले पुढे काय होणार आहे याचा अंदाज घ्यावा. पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या गाडीने फिरत असाल पण तुमच्या काळात साथ दिलेल्या सायकल ला विसरू नका.
नोकरीवर जातेवेळी पाया पडून अथवा आशीर्वाद घेतलेल्या व्यक्तींचा भान ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारे उत्तुंग शिखरावर जाल त्यांचा अपमान झाल्यास त्यांच्या श्रापाने रसातळाला जाल हे लक्षात ठेवा.
एखादी मुंगी चावली तर कळा येतात पण त्या मुंगीची नांगी आपण पकडू शकत नाही. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येक जण आपापल्या परीने श्रेष्ठ असतो.
पण सर्वज्ञानी नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. मुले आपल्या नोकरीवर असलेले आईबाप इतरांना कसकटासमान लेखतात. तुमच्या मुलात अजून कसे काही नाही. मुले काय करतात असे चलनी प्रमाणे विचारतात.
पण आपली हायफाय मुले अथवा मुली बाहेर काय गुण उधळतात हे सांगत नाहीत. व पुढील जन्मात त्याचे फळ त्यांना भोगावे लागते. मुले हुशार असूनही आर्थिक कमतरतेमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही हे ते विसरतात.
पूर्वीच्या काळातील मोठे संस्थानिक, जमीनदार, राजे रजवाडे, यांच्या पुढील पिढीची आजची स्थिती कशी आहे ते पहा. कलियुगात जे कराल ते याच जन्मात भोगाल. पापे वाढतील. पण जे चांगले कराल त्याचे फळही त्वरित मिळेल असे महाभारत कालीन श्रीकृष्णाने सांगितले आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!