Wednesday, June 19, 2024
Homeआध्यात्मिक"श्री स्वामी समर्थ" या षडाक्षरी मंत्राचा अर्थ नक्की काय आहे.? चला आज...

“श्री स्वामी समर्थ” या षडाक्षरी मंत्राचा अर्थ नक्की काय आहे.? चला आज जाणून घेऊयात.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो स्वामींची सेवा बरेचजण करत असतात. जो सेवेकरी श्रध्देने सेवा करतो त्याचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी स्वतः स्वामींची असते. तर मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अर्थ जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो, स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते. मात्र, केवळ चमत्कारात न अडकता, प्रत्येकाने ‘समर्थ’ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत, ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे, असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते. श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय? हे पाहुया…

मित्रांनो, षडाक्षरी स्वामी नाम ‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे, अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. ‘श्री स्वामी समर्थ’मधील श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज.

मित्रांनो, स्वामी शब्दाची फोड केल्यास ‘स्वाः + मी’ अशी होते. यातील स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. ‘मी’ म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा.

याचाच अर्थ असा की, ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा, असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे, असे सांगितले जाते.

स्वामी समर्थांची वचने – नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल.

प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा. हम गया नही जिंदा है.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular