Tuesday, June 11, 2024
Homeआध्यात्मिक“श्री स्वामी समर्थ” या नामस्मरणाने खरोखरच एवढे च’मत्कार होतात.. जाणून घ्या.!!

“श्री स्वामी समर्थ” या नामस्मरणाने खरोखरच एवढे च’मत्कार होतात.. जाणून घ्या.!!

मित्रांनो श्री गुरु माउली उवाच, “श्री स्वामी समर्थ”- आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची दु:खे येतात, क्ले’श सहन करावे लागतात. काही वेळा दु:ख वाट्याला येत तेव्हा खरोखर आपली नेमकी चूक कळत नाही. वाटत, ‘मी कुणाचंच वाईट करत नाही, मग माझ्याच वाट्याला हे का?’

आयुष्यात आनंदी आनंद असेल तर आपली काहीच तक्रार नसते पण कोणतही दु:ख आलं की कधी यातून सु’टका होते यासाठी त्या दु:खाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी इतर उपाय सुरु होतात. कोण सांगेल ते विधी, पूजा, व्रत, बु’वाबाबा नवस, पोथ्या यांची पारायण होतात. कसही करुन सुटका करुन घ्यायची असते.

पण हे प्रा’रब्ध भो’ग असतात, ते भो’गूनच संपवावे लागतात. परंतु बरीचशी दु:ख विनाकारण ओढवून घेतली जातात, वाट्याला येणार्या दु:खाचा त्रा’स समोरचा सुखात आहे हे पाहून अधिक बळावतो. आर्थिक सं’कट, क’र्ज, आ’जारपण, कौटुंबिक क’लह, नोकरीत क’टकटी, फ’सवणूक, व्य’सनाधीनता, दा’रिद्र्य अशा गोष्टींना सामोर जाव लागलं की आपण अस्वस्थ होतो, शांत राहू शकत नाही.

26 जुलैची पूरस्थिती सर्वांना आठवतच असेल. सर्वत्र फक्त पाण्याचं साम्राज्य होत. वाटा दिसत नव्हत्या, तरीही डोळ्यांसमोर घरी पोहोचणं हेच ध्येय होत. त्यावेळी चालताना गटाराचं पाणी आहे, पायाखाली नेमकं काय येईल समजत नाही, पुढे येणारा मदतीचा हात तेवढा दिसत होता, कोणाचा हात धरतोय हा विचारही नव्हता, तहान भूकेला बकाल वस्तीतून मिळालेला वडापाव, पाणी कशाकशाचंच वावगं नव्हत. हे सर्व महत्त्वाच नाही तर यातून घरी पोहोचणं महत्त्वाचं, एवढाच ध्यास मनात होता. त्यामुळे कसलाच बा’ऊ झाला नाही.

आपल्या आयुष्यात येणारी सुखदु:ख सुद्धा अशीच असतात. त्यांचा बाऊ न करता त्यातून वाट काढत राहिलं पाहिजे, हे सर्व असणारच, ते सहन केलच पाहिजे असा विचार करत माझ्या मुक्कामी, माझ्या भगवंताकडे मला पोहोचायचं आहे, अशी भा’वना आपण म’नात दृढ करु शकणार नाही का!

मुळात ही सुखदु:ख माझी आहेत, ह्या खोट्या भा’वनेत आपण पुरते गुंतून जातो. पण ही सुखदु:ख केवळ ह्या देहाची आहेत, आणि हा देह म्हणजे “मी” नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटून घ्यायचं कारणच नाही. काठावर बसून पाहणार्याला बुडायची भिती नसते. ह्या आयुष्याकडे आपणही असच काठावरुन पहायला शिकलं पाहिजे. रोजच्या जीवनात अनेक प्रसंग. घटना, क्षण बरच काही देवून जातात. शिकवतात. कधी सुखावणारं कधी दुखावणारं, हवहवस वाटणारं, नकोसं झालेलं, अस बरच काही आपण अनुभवतो.

आयुष्याकडे स्वत:ला दूर करुन पहाण्याच्या खेळात किती मौज वाटेल पहा. कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळणारं आयुष्य, कधी निराशेच्या मिट्ट काळोखाने काळवंडून जाणारं आयुष्य! ह्या जीवनात शीतल गारवा, बोचरी थंडी, उन्हाचा तप्तपणा कधी थंडगार जलधारांचा वर्षाव होतच रहातो. सुखाचा किंवा दु:खाचा वाटणारा प्रत्येक क्षण सेकंदासेकंदाला मागे पडत आयुष्य पुढेच सरकत असत. आपण मात्र त्या क्षणांमधेच कायम अडकून घेतो.

आरशात पाहून कसं स्वत:ला ठीकठाक करतो, तसंच आयुष्याकडे समोरुन पहाताना त्यातील बर्याच गोष्टी आपण सुधारु शकू. जीवन उजळवणं आपल्याच हाती आहे. असा जेव्हा आपण प्रयत्न अगदी तळमळीने करतो, तेव्हा मार्गातले अडसर स्वामीकृपेने दूर होवू लागतात. आयुष्यात नको त्या गोष्टींची चिंता करायचं सोडून आपण स्वामी नामाचं “चिंतन” करु या, चला स्वामीनाम म’नोभावे जपू या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular