Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकश्रीकृष्ण म्हणतात.. या दिशेला बसून जेवल्याने आपले आयुष्य कमी होते.!!

श्रीकृष्ण म्हणतात.. या दिशेला बसून जेवल्याने आपले आयुष्य कमी होते.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो आपल्या विविध धर्मग्रंथांमध्ये आपला दैनंदिन जीवनात काय करावे व काय करू नये.? याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. सकाळी कधी उठावे? कोणते वर्तन करावे? कोणते कार्य करावे? कोणते कार्य करण्याची? कोणती दिशा योग्य आहे? अशा अनेक विषयांबद्दल माहिती आपल्या धर्मग्रंथांमध्ये दिलेली आहे.

मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये जेवण करण्याचे काय नियम आहेत. जेवण करताना कोणत्या दिशेला बसून जेवण करावे. जेवण कसे असावे. कोणते जेवण आपल्या जीवनासाठी हानिकारक आहे. आणि कोणते जेवण आपल्या जीवनासाठी लाभदायक आहे. कोणत्या दिशेला तोंड करून जेवलास आपले आयुष्य कमी होते व कोणते जेवण आपल्याला सुख समृद्धी प्रधान करते. या विषयी सर्व माहिती या लेखामध्ये सांगणार आहोत.

मित्रांनो, वास्तुशास्त्रातही जेवण करण्याचे अनेक नियम सांगितले आहेत. जेवण करताना काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. चुकीच्या दिशेला बसून जेवण केल्यास ते आपल्या शरीराला हानिकारक असते. त्याचबरोबर जेवण करण्याआधी काही मंत्रांचा जप केल्यास त्यामुळे आपल्याला जेवण करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि त्या जेवणाचा आपल्या शरीरावर शुभ प्रभाव पडतो.

जेवण करताना जर आपण योग्य दिशेला बसून जेवण केले तर, आपल्या घरातील वाद तंटे कमी होतात व आपल्या घराला सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते. कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न आपण खाऊ नये. ज्याच्या त्याच्या वाट्याचे अन्न त्या व्यक्तीने खावावे. इतरांच्या वाटेचे जेवण आपन खाल्ले तर आपल्याला दारिद्र्य येते.

सर्वांना वाटून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य फळ मिळते व देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. वास्तुशास्त्रानुसार तूटलेला फुटलेल्या भांड्यांमध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते.

यामुळे आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण दिल्यासारखे होते. त्याचबरोबर जेवणाचे ताट हे स्वच्छ असावे व अस्वच्छ ताटात जेवण केल्यास त्यामुळे आपल्या जीवनात दुःख व दारिद्र्य येते. एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे जेवण करू नये.

वास्तुशास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार जेवण त्याच बरोबर मध्यपान ही करू नये. त्या दिवशी स्वातविक जेवण करावे. जेवणाची नासाडी करणे किंवा दुरुपयोग करणे हे सुद्धा वास्तु शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते. हे अनर्थचे कारण मानले जाते. म्हणून कधीही ताटात अन्न सोडू नये. आपल्याला जेवढे अन्नाची आवश्यकता आहे तेवढेच अन्न आपल्या ताटात घ्यावे. जर आपण तीन चार जण एकदम जेवायला बसले असतील. तर आपले जेवण झाल्यास लगेच उठू नये. सगळ्यांचे जेवण झाल्यावरच उठावे. जर असे केले नाही तर आपले पित्र आपल्यावर नाराज होतात.

आपल्याला पितृदोष होऊ शकतो. जेवण झाल्यानंतर ताटात हात धुणे हे देखील निषिद्ध मानले आहे. ताटात कधीही हात देऊ नये. हे नीच यो’नीतील जीवांचे लक्षण आहे. ताटात हात धुणे हे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणून ही चूक कधीही करू नये. आपल्या घरातील देवाला रोज नैवेद्य दाखवला. आपल्या घरात अन्नधान्यांची बरकत होते. कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही.

बिछान्यावर बसून कधीही अन्नाचे ग्रहण करू नये. यामुळे अनेक रोगांचा सामना करावा लागतो. जेवण करताना कोणालाही हटकून नये. जेवण करताना कोणाला हा हटाकल्यास आपल्या जेवणात दुर्भाग्य येते. वास्तुशास्त्रानुसार जेवण करताना पूर्व दिशेला तोंड करून बसल्यास व्यक्ती रोगांपासून तसेच मानसिक ताण तणावापासून मुक्त होतो. म्हणून आजारी व वृद्ध व्यक्तींनी नेहमी पूर्व दिशेला तोंड करूनच जेवावे.

आपल्या आरोग्यात निश्चितच सुधारणा होते. जर कोणाला नोकरी मिळवण्याची इच्छा असेल किंवा व्यवसायात भरभराट निर्माण करण्याची इच्छा असेल. तर अशा व्यक्तींनी उत्तर दिशेला तोंड करून जेवायला बसावे. दक्षिण दिशेला तोंड करून जेवलास व्यक्ती अल्पायु होतो. त्यामुळे या दिशेला तोंड करून कधीही जेवू नये. धनधान्य मध्ये वाढ होण्यासाठी पश्चिम दिशेला तोंड करून जेवावे.

अशाप्रकारे जेवणाचे नियम या लेखामध्ये तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही करून बघा तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular