Sunday, May 19, 2024
Homeराशी भविष्यशुक्र-चंद्राची युती होणार.. या राशींना परदेश दौऱ्याबरोबर मिळणार भरपूर आर्थिक लाभ.!!

शुक्र-चंद्राची युती होणार.. या राशींना परदेश दौऱ्याबरोबर मिळणार भरपूर आर्थिक लाभ.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांचं अनोखं नातं आहे. प्रत्येक ग्रह त्याच्या स्वभावानुसार फळं देत असतो. त्यामुळे कुंडलीतील बारा स्थानात ग्रह कुठे बसले आहेत. यावर त्या त्या व्यक्तीला शुभ अशुभ परिणाम मिळत असतात. जन्माच्या वेळी कुंडलीत असलेले ग्रह आणि ठरावीक कालावधीनंतर ग्रहांचे गोचर परिणामकारक ठरतात. त्यामुळे ग्रहांच्या राशीबदल किंवा गोचरानुसार शुभ अशुभ परिणाम ठरवले जातात.

प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा ठरलेला आहे. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी, तर शनि मंद गतीने अडीच वर्षांनी राशी बदल करतो. कधी कधी गोचर कालावधीत एकापेक्षा अधिक ग्रह एका राशीत येतात. त्यामुळे काही शुभ अशुभ योग तयार होतात. आता 24 ऑगस्ट 2022 रोजी चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शुक्र ग्रह आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे कर्क राशीत चंद्र-शुक्र युती होणार आहे. या युतीमुळे तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.

मेष रास – मेष राशीच्या लोकांना या युतीचा विशेष लाभ मिळू शकतो. या राशीतील चतुर्थ स्थानात युती होत आहे. या स्थानाला केंद्र स्थान म्हटलं जातं. यामुळे मेष राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल. या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. कला क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. या युतीमुळे परदेशात उद्योग असलेल्या व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल.

कर्क रास – या राशीच्या कुंडलीत लग्न स्थानात हा योग तयार होत आहे. या काळात जोडीदाराशी संबंध सुधारतील. प्रेमसंबंधात यश मिळेल. त्याचबरोबर व्यवसायासाठीही हा काळ शुभ राहणार आहे. या काळात नवीन ऑर्डर मिळू शकतात. सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे.

कन्या रास – शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे चांगले दिवस सुरू होतील. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील अकराव्या स्थानात युती होत आहे. या स्थानाला उत्पन्न आणि नफ्याचे स्थान मानले जाते. या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजा ने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोच वल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular