Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकस्त्री आकर्षण.. घरात वे'श्या आणली म्हणून स्वामी महाराजांची अवकृपा झाली.!! मग नंतर..

स्त्री आकर्षण.. घरात वे’श्या आणली म्हणून स्वामी महाराजांची अवकृपा झाली.!! मग नंतर..

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, एके दिवशी मामलेदार गणेश हरी सोहने यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. स्वामी महाराज देखील तिथे उपस्थित होते. मध्यरात्रीची वेळ झाली होती. यातच थोडाफार पाऊस पडत होता. यातच स्वामी महाराज उठले व घराबाहेर जाऊ लागले.

स्वामी महाराज घरा बाहेर जात आहे हे पाहून लगेचच गणेश सोहनी त्यांच्याजवळ गेले व स्वामी बाहेर न जाता घरातच थांबावे. अशी विनवणी केली. पण स्वामींनी काही त्यांचे ऐकले नाही व स्वामी म्हणाले, अरे तुमच्या घरात आम्हाला विटाळ होतो. आम्ही येणार नाही जा असे म्हणून ते पुढे चालू लागले.

चालत चालत ते एका जंगलात गेले. गणेशराव देखील एक मशाल घेऊन त्यांच्या मागे जात होते. जंगलात गेल्यानंतर गणेश रावांनी स्वामींना खूप विनवण्या करून घरी येण्याचा आग्रह धरला. परंतु स्वामिनी त्यांचे काहीएक ऐकले नाही. गणेश राव त्यांना म्हणाले स्वामी आपण पुन्हा कधी दर्शन देणार? तेव्हा स्वामी हसत म्हणाले, आम्ही आता आंब्याच्या दिवसात येईन! स्वामिनी असे बोलल्यावर गणेश राव नामुष्की ने परत घरी आले.

त्यावेळी गणेशरावांनी स्वामींच्या सेवेसाठी एक माणूस ठेवला होता असो. स्वामीभक्तहो गणेश रावांनी घरात वेश्या ठेवली होती. ती वेश्या सोडावी, त्या वेश्या ची संगत सोडावी असे स्वामींनी गणेश रावांना सांगितले होते. तुझ्या घरात विटाळ होतो असे स्वामींनी गणेश रावांना त्याच साठी सांगितले होते. गणेश रावांची जरी स्वामीवर अपार भक्ती असली तरी मोहमायेच्या झपाट्याने त्यांना झपाटलेले होते.

म्हणूनच त्यांना परब्रम्हापेक्षा देखील त्यांना त्या स्त्रीचे आकर्षण होते. परंतु पुढे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. सन 1851- 52 साली जिल्ह्याचे कलेक्टर मोहळ तालुक्याच्या जमावबंदी साठी आले असताना कलेक्टर साहेबांनी देखील गणेश रावांना तुम्हाला हे कृत्य शोभत नाही तुम्ही बाईचा नाद सोडून द्या… असे सांगितले होते. पण गणेश रावांनी त्यांनाही माझी खाजगी गोष्ट आहे आणि तुम्ही या खाजगी गोष्टीत लक्ष घालू नये असे सांगितले.

त्यामुळे कलेक्टर साहेबांना खूपच राग आला होता पुढे त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल झाले व या गुन्ह्यात ते स्वामींच्या कृपेने निर्दोष मुक्त झाले . पण त्यांची मामलत गेली. त्यानंतर ते सोलापुरात जाऊन काही दिवस घरीच थांबले. स्वामीभक्तहो संकट काळात माणूस खूप काही शिकतो आणि गणेशराव यांच्या बाबतीतही तसेच घडले. गणेशरावांना पुढे सद्बुद्धी आली व त्यांनी त्या बाईचा नाद सोडला.

परत त्यांचा विकास सुरू झाला. बडोद्यात त्यांना मामलताची जागा मिळाली. स्वामिनी सांगितल्याप्रमाणे स्वामींनी त्यांना बरोबर आंब्याच्या दिवसात दर्शन दिले. स्वामी महाराज दिगंबर रूपात आले व दोन आंबे त्यांना देऊन ते परत निघून गेले . विकारांच्या आहारी गेलेले मन हे आपल्या मनाची पवित्रता अशुद्धता वाढविते आणि हाच स्वामींच्यासाठी खरा विचार विटाळ आहे. आणि हा विटाळ जिथे तिथे स्वामी नाहीत.

आजच्या या लिलेतून आपल्याला समजले कि, जर खरंच स्वामी हवे असतील तर आपले मन हे शुद्ध असले पाहिजे. अंतकरण हे शुद्ध असलेच पाहिजे. हा बोध आपल्याला आज यातून समजलाच असेल. स्वामीभक्त हो निसर्गाने काही उपजत भावना मानवाला दिलेत. मानवाच्या शरीरात दिलेल्या या भावना म्हणजे एक वरदानच आहे. या भावनांचा आपण योग्य रीतीने वापर केला पाहिजे. त्यामुळे विकास होईल.

या वरदानचा जर अयोग्य असा वापर केला तर याचे विकारात रूप धारण होईल. जसे काम याचा उद्देश भविष्यातील साखळी पिढीसाठी सुरू ठेवणे असा आहे. यासाठी आपल्या जाणकारांनी विवाह पद्धती सुरू केली आहे. पण काम या भावनेला जर वेगळ्या अर्थाने हाताळले तर याने अनेकांचे जीवन विखरुन गेलेले आहे. यात सांगितल्याप्रमाणे म्हणजे गणेश रावांसारखे अधोगतीला जाईल.

स्वामीभक्तहो या निसर्गनिर्मित भावनांना उत्तमपणे हाताळण्याचा सर्वात छान उपाय म्हणजे आपले प्रत्येक कर्म. हे स्वामी सेवा भावनेने करणे आणि तसे प्रशिक्षण आपल्या मनाला देणे जसे स्वामींनी मला कुटुंब दिले आहे मी कुटुंब प्रमुख आहे किंवा सदस्य आहे या नात्याने कुटुंबाचा विकास करणे, कुटुंबासाठी धनसंचय करणे, मुलांवर उत्तम संस्कार करणे हे स्वामी सेवाच आहे.

अशी भावना जर आपण जोपासली तर कुटुंब सेवा ही स्वामी सेवाच आहे. हे झाले कुटुंबासाठी. आपण ही भावना आपल्या नोकरीधंद्यासाठी देखील ठेवू शकतो. आपण राहत असलेल्या लोकांसाठी ठेवू शकतो. देशासाठी ठेवू शकतो. म्हणजे काय तर आपण कोणतेही कर्म करत असलो तर ते कर्म करत असताना आपली भावना, आपले मन हे शुद्ध असायला हवे.

ज्या मनामध्ये शुद्धता असेल तेथे स्वामीमहाराज नक्की असणारच. अशा प्रकारे जर शुद्धभावनेने आपण कर्म करत राहिलो तर आपला सर्वांगीण विकास हा होणारच. चला तर मग आपण स्वामींना प्रार्थना करूया विकारी मन हे अशुद्ध आहे आणि ह्या विकारी मनाचा तुम्हाला विटाळ आहे.

ही समज देऊन तुमचा निवास शुद्ध अंतकरणात होतो. शुद्ध भावनेने कर्म केल्यास तेथे तुमचा निवास होतो. अशी शिकवण तुम्ही आम्हाला दिली. याबद्दल स्वामी तुम्हाला धन्यवाद. माऊली आम्हाला मार्गदर्शन करा. कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेयर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular