Monday, December 11, 2023
Homeआध्यात्मिकस्त्रियांनी दत्त अभिषेक करावा का.? केल्याने काय होईल.? कोणते नियम पाळावे.?

स्त्रियांनी दत्त अभिषेक करावा का.? केल्याने काय होईल.? कोणते नियम पाळावे.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो स्त्रियांनी दत्त अभिषेक केला तर चालतंय का.? तसं तर मित्रांनो दत्तभक्ती कोणीही करू शकतं.. कारण ईश्वराने ज्यावेळेस आत्मा निर्माण केला. तो आत्मा देहामध्ये स्थापन केला. त्यावेळी देवाने पुरुषतत्त्व, स्त्रीतत्त्व निर्माण केले. या जगात स्त्री विना पुरुष अधुरे आहेत आणि पुरुष विना स्त्री अधुरी आहे. आणि या दोघा विना परमेश्वर अधुरा आहे. तर स्त्रिया दत्तभक्ती करू शकतात. तसेच दत्त अभिषेक सुद्धा करू शकता. पुरुष पण भक्तिमार्ग करू शकतात आणि स्त्रिया पण भक्तिमार्ग करू शकतात. असे कुठेही लिहिलेले नाही की स्त्रियांनी दत्त अभिषेक करू नये.

असे कुठेही लिहिलेले नाही की स्त्रियांनी कोणत्याही देवाचे अभिषेक करू नये. तर तुमच्या मनातील असा गैरसमज मनातून बाहेर काढून टाका. तर तुम्ही श्री दत्त चरणी जाऊन दत्ता अभिषेक चालू करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर अनुभव मिळतील. आणि याचे फक्त दोन नियम आहेत. ज्यावेळी तुम्हाला मासिक पाळी येईल त्यावेळी पाळायचे आहेत.

त्यावेळी तुम्ही दत्त अभिषेक घालू नका. आणि ज्यावेळी तुमच्या घरा मध्ये सुतक येते त्यावेळी तुम्ही दत्ता अभिषेक घालू नका. आणि सर्वात महत्त्वाचे कारण जर तुमच्या घरा मध्ये कोणी दारू पीत असेल, मां’साहार करत असेल तरी पण तुम्ही दत्त अभिषेक घालू नका. गुरुचरित्रात भगवंतांनी सांगितले आहे की दारू पिणार्याच्या आणि मासाहार करणाऱ्याच्या घरी दत्तकृपा होत नाही.

तर तुम्ही पहिला या गोष्टी बंद करा मगच दत्त अभिषेक करा. आणि तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. कोणाला पहिल्या दत्त अभिषेक मध्ये अनुभव येतील. कोणाला दुसऱ्या दत्त अभिषेक मध्ये अनुभव येतील. कोणाला चार तर कोणाला आठ दत्त अभिषेक मध्ये अनुभव येतील. हे सर्व नियम पाळून सर्वजण आपापल्या परीने दत्त अभिषेक करावे. श्री दत्तांचे नामस्मरण चालू करा.

यामुळे तुमचे आयुष्य सुखाचे होईल. आनंदी रहाल. तुम्ही तुमच्या सर्व समस्या श्रीदत्तां समोर मांडू शकता. ते सुद्धा आपले आई-वडीलच आहेत. तुम्ही तुमच्या सर्व समस्या सर्व इच्छा दत्त महाराजांना सांगू शकता. तर स्त्रियांनी दत्ता अभिषेक केला तर चालतो फक्त हे नियम काटेकोरपणे पाळावे. बाकी कोणतेही नियम नाही. श्री दत्तांच्या चरणी जावा.

श्री दत्त महाराजांचा का दयाळू कोणीच नाही आहे. श्री दत्त महाराज म्हणजे जगाची माउली म्हटले जाते. दत्त महाराज हे तिन्ही लोकांचे गुरु मानले जातात. स्त्रियांनी दत्त अभिषेक घालावा व त्याचा अनुभव घ्यावा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular