Sunday, June 16, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी महाराज कसे होते.? जाणून घ्या स्वामींबाबत विशेष.!!

स्वामी महाराज कसे होते.? जाणून घ्या स्वामींबाबत विशेष.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, सामी महाराजांबद्दल आपण बराच काही एकल आहे. परंतु आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की स्वामी कसे दिसत असतील?? स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना..ज्या लोकांनी स्वामींना बघितलंय ते किती भाग्यवान..न जाणो आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू..आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल..आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्याला ही चांगलंच झापल असेल. समकालीन बखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे सात – सव्वा सात फूट होती. त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल. त्यांची नखे कापायला न्हावी येत तो म्हणत स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्या चं जणू. हातानेही ती तुटत.

मित्रांनो, स्वामींची पावले लोण्याहून मऊ त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजत नसे. चिखलातून ही जर स्वामी चालले तरी त्यांची पाऊले लखलखीत स्वच्छ. त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे जणू सारं ब्रह्मांडच सामावलंय त्यात. स्वामींची त्वचा खूप नितळ, कोमल होती. आपले स्वामी मनाचे राजे होते. ते कित्येक दिवस अंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळा अंघोळ करत. पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई.

मित्रांनो, स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे. त्यामध्ये कधी खीर, मसाले दूध असे तर कधी पन्हे. स्वामींची जेवणाची तऱ्हा ही निराळीच. कित्येक दिवस, महिने ते जेवत नसत अगदी पाणीसुद्धा घेत नसत. तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात ६००-७०० भाकऱ्या खात.

दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला. कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून “जेवण घाल गे माये” अस म्हणत. परंतु घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गायीला घालत. स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गाई, कुत्रे येऊन जेवत स्वामी ही त्यांना प्रेमाने घास भरवत.

मित्रांनो, गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन होत. त्यांनी “ह्याची देही ह्याची डोळा” स्वामींना पहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरुपात लिहून ठेवले आहे. त्यातील वाचलेला एक भाग जशाचा तसा इथे नमूद करत आहे. “स्वामींना कधी गाढ झोपल्याचे, पाहिलेले आठवत नाही. फार रात्र झाली की तोंडावरून पांघरूण घेऊन स्वतःला झाकून घेत.

मग पांघरुणातून रात्री दीड दोन च्या सुमारास कधी भारुड तर कधी अभंगाचे आवाज येत. बऱ्याचवेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत. अचानक मोठ्मोठ्यानी वेद म्हणत. कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत. असे रात्रभर चाले. अश्या कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत”

मित्रांनो, स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती. एकदा अक्कलकोट गावाच्याबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला. त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालताक्षणीच, इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले” अरे बघा रे ! कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे” भक्तमंडळीनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले.

मित्रांनो, स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणी गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणी तिच्या आचळाना तोंडाने ढुशी देत मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गायीला मिठी मारून “माझी माय ग ती “असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular