Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी महाराजांचा 'हा' एकच मंत्र मनापासून बोला आणि 5 मिनिटात चमत्कार बघा.!!

स्वामी महाराजांचा ‘हा’ एकच मंत्र मनापासून बोला आणि 5 मिनिटात चमत्कार बघा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो स्वामीं महाराजांच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती एक खुप मोठी ताकद आहे. आणि आज आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांच्याच नामस्मरणाचा असाच एक पावन मंत्र सांगणार आहोत. या मंत्राच्या जपामुळे तुम्हाला पाहिजे त्या हव्यात त्या सर्व गोष्टी सहज मिळतील. तुमची सर्व कामं तुमच्या मनासारखी होत जातील.

जसं की तहानलेला याचक जेव्हा स्वामी महाराजांना पाण्याच्या थेंबासाठी याचना करत असतो. तेव्हा स्वामी महारज त्या याचकाला पाण्याने तुडुंब भरलेला महासागरच देतात. परंतु एक लक्षात असू द्या आपल्याला पदरात तेवढेच मिळत असते जेवढं आपल्या पात्राचं माप ठरलेलं असतं. म्हणून आपल्याला आपल्या त्या पात्रावर आपल्या कुवतीनुसार काम करायचे आहे.

जर पात्राचे आकारमान वाढवायचे असेल. त्यासाठी आपल्याला आपली वृद्धि व श्रद्धेची शक्ती कामी आणायला पाहिजेल. त्या श्रद्धेचाच वापर आपल्याला करायचा आहे. विशेष म्हणजे स्वामी महाराज स्वतः यासाठी आपल्याला अदृश्यपणे मदत करत असतात. म्हणून आपणही त्या अदृश्य शक्तीच्या व श्रद्धेच्या मार्गावर चालत राहायला पाहिजे.

म्हणून नेहमी असाच विचार करावा की आपल्या हातून जास्तीत जास्त चांगले कार्य घडायला पाहिजे. आपण कधी चकूनही वाईट मार्गावर चालायला नको. तुम्हाला कुणीही कधीही काहीही बोलू द्या. परंतु तुम्ही त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलू नका. कारण तोच कर्ता करविता आणि आपल्या भल्या बुऱ्याचा हिशोब ठेवणारा वरतून सर्व काही बघत असतो.

तो पाहत असतो की तुम्ही इतरांबद्दल काय विचार करता आहात आणि इतरजण तुमच्याबद्दल काय विचार करतात. म्हणून कधीही वाईट विचार करू नका. कुणाच्याही बाबतीमध्ये आपण नेहमीच चांगला विचार केला पाहिजे. त्यांनी आपल्या बद्दल काहीही विचार करू द्या परंतु आपण नेहमी त्यांच्या प्रति चांगलाच विचार करायला हवा.

म्हणून आपल्याला जेवढी भक्ती, जितकं पुण्य साठवता येईल तेवढं साठवावं. आणि भविष्याच्या वाटचालीत तीच आपली शक्ती असते. ती शक्ती च पुढे जाऊन आपल्या उपयोगाला येते. म्हणूनच स्वामी महाराजांचे नित्य नामस्मरण करा. स्वामी महाराजांच्या मंत्राचा जप करा. म्हणून तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हटला तर सकाळपर्यंत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही.

आणि तुम्हाला हवं असलेलं सर्व काही मिळेल. तुमची सर्व कामं तुमच्या मनासारखी होऊ लागतील. स्वामी महाराजांचा हा एक मंत्र तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि रोज सकाळी उठल्यावर म्हणा. स्वामी महाराज तुमच्या सदैव पाठीशी उभे असतील. तुमच्या सर्व काही इच्छा ते पूर्ण करतील. कोणतीही अडचण असू द्या या एका मंत्राच्या उच्चाराने ती अडचण दूर होईल.

तर मित्रांनो तो मंत्र असा आहे. “श्री स्वामी समर्थाय नमः” या मंत्राचा जप तुम्ही रोज करावा. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व कटकटी अचानक दूर होतील व तुमची सर्व कामं तुमच्या मनासारखी होऊ लागतील. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतांना तुम्ही स्वतः अनुभवाल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular