Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकस्वामीं महाराजांची सेवा सुरु करण्याचा सर्वात शुभ दिवस कोणता‌.? जाणून घ्या.!!

स्वामीं महाराजांची सेवा सुरु करण्याचा सर्वात शुभ दिवस कोणता‌.? जाणून घ्या.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ.!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात. मनापासून जे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींना शरण जातात त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत रहा, घाबरू नका असे सांगितले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आहे. स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं आयुष्य सुरक्षित करतात, आनंदीत बनवतात. स्वामींची योग्य आणि अचूक, नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याच फळ खूप मोठ मिळतं. ही सेवा तुमच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर करा, ही एक सोपी स्वामी सेवा आहे.

जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल, चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काहीही गोष्टी असतील त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने, मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस, तसेच 3 महिने, 1 महिना जशी असते तशी केली, आपल्याला जशी जी सांगितली आहे ती आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

ज्या कार्यासाठी आपण की सेवा करतो ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात. आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्वामी समर्थांची सेवा केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात ते आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु जे नवीन स्वामी घरी आहे किंवा जे स्वामींचे सेवा सुरू करणार आहे त्यांना ची सेवा कशी सुरु करावी आणि कोण कोणते नियम सेवेमध्ये पाळायचे असतात आणि त्याचबरोबर स्वामींचे सेवा आपण कोणत्या दिवसापासून सुरुवात करावी.?

यांसारखे अनेक प्रश्न पडलेले असतात आणि म्हणूनच मित्रांनो त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा असून सुद्धा ते स्वामी सेवा करायचा प्रयत्न करत नाहीत तर मित्रांनो आज आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यांची सेवा ही आपण कोणत्या दिवसापासून सुरू करावी की ज्यामुळे आपल्याला स्वामी सेवेचे फळ लवकरात लवकर मिळेल.

तुमची कोणतीही सेवा असेल मग ती पाच मिनिटाची असेल दहा मिनिटांची किंवा अर्धा तासाची किंवा 108 माळ जपाची सेवा असेल स्वामींची अगदी छोट्यातली छोटी किंवा मोठ्यात मोठी कोणतीही सेवा असेल ती मित्रांनो सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ जो दिवस मानला जातो तो म्हणजे गुरुवारचा कारण मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थांसाठी अत्यंत प्रिय मानला जातो.

स्वामींच्या आवडीचाही हा दिवस आहे आणि म्हणूनच मित्रांनो जर सेवेकरी गुरुवारच्या दिवसापासून स्वामी सेवा सुरू करतो किंवा स्वामींचा नाम जप करायला सुरुवात करतो स्वामींचे पूजा करायला सुरुवात करतो त्या भक्तावर स्वामी लगेचच प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद ही त्या भक्ता बरोबर कायम राहतो.

म्हणूनच मित्रांनो आपल्याला जर आपण कोणतीही स्वामींची सेवा किंवा मंत्र जप सुरू करणारा असो किंवा स्वामींची पूजा करायला सुरुवात करणार असेल तर यासाठी गुरुवारचा दिवसच निवडावा आणि मित्रांनो तुम्हाला जर इतरत्र कामांमुळे किंवा इतर कोणत्या गोष्टींमुळे गुरुवारपासून स्वामींची सेवा सुरू करायला शक्य होत नसेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही एका चतुर्थी पासून स्वामींची सेवा सुरू करू शकता.

मित्रांनो गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी त्याचबरोबर इतर कोणत्याही महिन्यांमध्ये येणाऱ्या चतुर्थी पासून तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करू शकता. आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या सेवेचे चांगले फळ हवे असेल आणि स्वामींचा आशीर्वाद लगेचच प्राप्त करून घ्यायचा असेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा या दिवसापासून स्वामींची सेवा किंवा स्वामींचा जप किंवा इतर स्वामी संबंधित कोणतीही पूजा सुरू करा यामुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला लगेच प्राप्त होईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular