Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकस्वामी माऊलींच्या नामस्मरणात आहे प्रचंड ताकद..बघा स्वामींना त्यांचा जुना भक्त परत मिळाला.!!...

स्वामी माऊलींच्या नामस्मरणात आहे प्रचंड ताकद..बघा स्वामींना त्यांचा जुना भक्त परत मिळाला.!! सत्यकथा..

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, हा अनुभव गीतांजलि ताई यांचा आहे. ते सांगतात मी माझ्या माहेरी आजी आजोबांबरोबर सातवी आठवी पासून स्वामी भक्ती करत होते. स्वामी चे पुस्तक वाचून त्यांच्याबद्दल ओळख झाली. तसेच ते दत्ता अवतारी असल्याची माहिती मिळाली.

माझी स्वामिभक्ती चालू होती. नोकरीला जाताना वाटेत स्वामी मंदिर होते. तिथे दर्शन घेऊनच मी जायचे. पुढे लग्न झाले तरीही माझ्या घरात सासरी मोठ्या वहिनी सौभाग्यवती विद्याताई वारे या पण स्वामी भक्त आहेत. तर स्वामींची प्रार्थना आम्ही तिन्ही जावा म्हणत असत. पुढे काही कारणाने हे बंद झाले.

व माझ्या घरात स्वामींचा फोटो होता. त्यानंतर नवीन घर घेतले. तिथेही स्वामींचा फोटो होता. तसेच आदिमाया रूपातील हे स्वामींचा फोटो आहे. काही कारणामुळे स्वामींची प्रार्थना बंद झाली. जप वगैरे काही नाही. मग 2014 ला मला स्वामींनी स्वप्नात येऊन आज्ञा केली.

की तू स्वामी समर्थांचा जप करत जा बरं का. अशा शब्दात बोलले. पण पुढे मीही काही केले नाही. स्वप्न होते म्हणून सोडून दिले पण आता या कोरोना काळात स्वामी पुण्यतिथी च्या अगोदर मठातून आदेश आला की कोरणा संरक्षणासाठी स्वामी समर्थांचा जप करावा.

संकल्प करून हे संकट जावे यासाठी मग स्वामीनी आदेश दिला म्हणून परत स्वामी सेवा सुरू केली. याच वर्षापासून स्वामींनी माझी निवड केली जपासाठी. हा संकेत असे सांगतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

जय जय श्री स्वामी समर्थ हा सत्य अनुभव आहे. स्वामींनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिले. व माझे माहेरची संबंध काही ठीक नाही आहेत काही कारणाने. याची विचारणा केली यावरून असे सिद्ध होते की त्यांचे माझ्यावर लक्ष आहे.

आणि अडचणीतून तेच मार्ग काढतील. घरात आता स्वामी मूर्ती आहे. व त्या मूर्तीवरील भाव इतके छान आहेत. हसरी मुर्ती आहे, पूजा व सेवा केल्यावर जास्तच हसते. आणि स्वामी खुश आहेत माझ्यावर व त्यांना त्यांचा जुना भक्त परत मिळाला याचा त्यांना आनंद आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular