नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, एकदा घडलं असं काही की श्री टेंबे स्वामी स्वतः वासुदेवानंद सरस्वती या मंदिरात पूजे साठी बसलेले होते. नेमकं त्याच वेळी कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले. पंचपक्वानाचे प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजाऱ्याचा मोह अनावर झाला. त्याने ते देवासाठी आणलेलं नैवेद्याने भरलेले ताट लगोलगच फस्त केले.
तेव्हा श्री टेंबे स्वामी समोर असलेल्या त्या पुजाऱ्यावर खूपच संतापले. त्याला खूप बोलले व ते पुन्हा पुजेसाठी बसले. पुजा आटोपल्यानंतर, श्री टेंबे स्वामीं प्रभू “श्री गुरु दत्तात्रेयांना” देवालयाच्या गाभाऱ्यातून निघून जाताना पाहतात. मग त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्ताञेयांचे दर्शनही मिळत नाही. म्हणून श्री टेंबे स्वामींच मन बैचेन होऊ लागतं. त्यांना नंतर नंतर त्यांची चूक लक्षात येते.
त्यांना कळून चुकतं की श्री गुरू दत्त आपल्याला दर्शन का देत नाहीयेत. त्यांना लगेचच त्या दिवशीचा घडलेला तो प्रसंग आठवतो., आणि त्यांच त्यांनाच कळून चुकतं की आपण त्या पुजाऱ्याला खूप टाकून बोललो. आणि म्हणूनच श्रीगुरु दत्ताञेयांना माझा राग आला असावा. तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतीं यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, आणि आश्चर्यकारकरित्या त्यांच्या मुखातून करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडतात.
“शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता” ।।
“शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता” ।।
त्यांच्या मुखातून पडत असलेले करुणा ञिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरु दत्ताञेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर प्रकट होतात. श्री टेंबे स्वामी म्हणतात की, “देवा माझं काही चुकलंय का.? असे मला वाटत नाही. तुम्हाला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजाऱ्याने तो नैवेद्य खाऊन टाकला म्हणून मी त्या पुजाऱ्यावर चिडलो”.
मग त्यावर श्री गुरु दत्ताञेयांनी श्री टेंबे स्वामींना प्रश्न केला, की “इथे सत्ता कुणाची? ” ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, “देवा इथे तर सत्ता तुमचीच आहे. इथे सारे काही तुमच्या इच्छेने चालते.“ त्यावर “श्री गुरु दत्ताञेय” श्री टेंबे स्वामींना म्हणाले की, अरे तो पुजारी गेली तीन दिवसांपासून उपाशी होता, म्हणून मी त्याच्या साठी ते पंचपक्वाननाचे ताट मी पाठविले होते. माझ्याच इच्छेने त्या पुजाऱ्याने ते खाल्ले. त्यात तुझे काय गेले ? त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळाली व श्री गुरु दत्ताञेयांच्या चरणात अंतर्धान पावले.
अध्यात्मिक मार्गावर प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून आणि प्रसंगी त्यांच्या गुरुंकडून क्षणोक्षणाला त्या भक्ताची परीक्षा बघितली जाते. स्वामी मार्ग हा इतका पण सोपा मार्ग नाही. श्री टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते. त्यांच्या एका रागामुळे त्यांची अशी अवस्था झाली. आपण तर सामान्य माणसं आहोत आपण जर राग आवरु शकलो नाही तर, आपण केलेली आयुष्यभराची स्वामींची साधना व्यर्थच ठरु शकते.
आपण ज्या पण देवालयात जातो, तिकडे गेल्यावर तेथे एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, त्या मंदिरात त्या ईशवराची, भगवंताची सत्ता असते, तिथे काय घडते, चांगले, वाईट, चुकीचे या सर्व गोष्टींवर साक्षात भगवंताचे लक्ष्य असते, ते जरी आपल्याला चुकीचे वाटत असेल तरी त्यामागचा हेतू हा फक्त भगवंताला माहीती असतो त्यामुळे तिथे चांगले, वाईट काय घडते हे आपण पाहू नये.
किंवा त्यासाठी कुणाला जाब विचारला जाऊ नये. “देवालयातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांच्या सर्वच कृती त्या भगवंताला माहीती असतात”. ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते. अशा ठिकाणी सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करायला हवा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!